शिल्पा शेट्टीच्या डोक्यापासून मानेपर्यंत हजारो सुया टोचल्या; फोटो पाहून चाहते घाबरले

शिल्पा शेट्टीच्या डोक्यापासून मानेपर्यंत हजारो सुया टोचल्या; फोटो पाहून चाहते घाबरले

सोशल मीडियावर जवळपास सगळेच सेलिब्रिटी सक्रिय असतात. ते चाहत्यांना आपल्या आयुष्याबद्दलचे तसेच, चित्रपटांबद्दलचे सगळे अपडेट्स देत असतात. त्यामध्ये एक सेलिब्रिटी आहे ती म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा सोशल मीडियवर कायम सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ कायम पोस्ट करत असते. असाच एक फोटो शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण हा फोटो पाहून चाहतेच घाबरले आहेत.

शिल्पा अनेकदा तिचे सुंदर फोटो पोस्ट करत असली तरी, यावेळी चाहते ते पाहून खरोखरच घाबरले आहेत. यामागे एक मोठे कारण आहे, जे तुम्हाला तिचा फोटो पाहिल्यानंतरच लक्षात येईल. तिचा चेहरा पाहूनच नेटकरी घाबरले.

शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्यावर हजारो सुया का टोचल्या आहेत?

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून तिचा एक सेल्फी पोस्ट केला होता. हा फोटो तिच्या इतर फोटोंपेक्षा खूप वेगळा आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्यावर अनेक बारीक सुया टोचवलेल्या दिसत आहेत. एवढच नाही तर शिल्पा शेट्टीच्या डोक्यावर, कपाळावर, गालावर आणि अगदी मानेवरही सुया टोचवलेल्या दिसत आहेत. आता अभिनेत्रीला या अवस्थेत पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Shilpa Shetty Acupuncture Treatment Shocks Fans, Viral Photo

सायनससाठी थेरपी

ती एका क्लिनिकमध्ये दिसतेय. पण तिच्या चेहऱ्यावर इतक्या सुया का टोचवण्यात आल्या आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ही अभिनेत्री अ‍ॅक्युपंक्चर उपचार घेताना दिसत आहे. सायनस बरा करण्यासाठी ही सर्वोत्तम थेरपी आहे आणि ती एक नैसर्गिक थेरपी आहे.

हा फोटो शेअर करताना, अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला आहे की ती सायनसमुळे अ‍ॅक्युपंक्चर उपचार घेत आहे.या उपचाराने लोकांना वेदना , तसेच काही समस्यांपासून नक्कीच आराम मिळतो. आता ही शिल्पा सायनसपासून आराम मिळवण्यासाठी या उपचारांची मदत घेताना दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आज संतापाची लाट उसळली. नामफलकाला काळे फासत प्रशासकांवर चिल्लर फेकून...
‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव
साताऱ्यात उद्योगमंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस
वक्फवरून गुजरात, बिहारसह आठ राज्यांत भडका, जुम्म्याच्या नमाजानंतर ठिणगी पडली; रस्त्यावर उद्रेक, उग्र निदर्शने
तुमच्या वादाशी प्रकल्पग्रस्तांना काहीही देणे घेणे नाही, मिठी नदी प्रकल्पबाधित भरपाईच्या प्रतीक्षेत; हायकोर्टाने सरकारला सुनावले
डोंगरी बालगृहातील मुलांची ‘हाऊसफुल्ल’कलाकारी, मुलांच्या काल्पनिक व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांची पसंती
अमेरिकेची जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी, फ्रान्सने गुंतवणूक थांबवली चीनने 34 तर कॅनडाने 25 टक्के कर लादला