बदलापूर एन्काउंटर न्यायालयीन अहवालाला आव्हान देणार
बदलापूर एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगाने दिलेल्या अहवालाची ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेला आव्हान दिले जाणार आहे, अशी माहिती बुधवारी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली. न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकल पीठासमोर मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी ही माहिती दिली. यासाठी मूळ याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंतीही मुख्य सरकारी वकील वेणेगावकर यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी 7 मे 2025 पर्यंत तहकूब केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List