कोर्टाच्या तारखा मिळतील पण सीटी स्कॅन चाचण्यांना तारखा मिळत नाहीत, राहुल नार्वेकर यांनी ठेवले गैरव्यवस्थेवर बोट
एकवेळ कोर्टाच्या तारखा मिळतात पण हॉस्पिटलमध्ये सीटी स्पॅन-एमआरआयच्या चाचण्यासांठी तारखा मिळत नाहीत, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शासकीय रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर बोट ठेवले.
अकोला जिह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टेस्ला मशिन खरेदीवर विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राहुल नार्वेकर यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात एमआरआय व सीटी स्पॅन चाचण्यांसाठी रुग्णांना मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जे. जे. रुग्णालयातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. यावर त्वरित उपायजोयना व्हाव्यात यासाठी लवकरच सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देश सरकाराला दिले.
कामा रुग्णालयात महिलांच्या प्रसूती, मूत्रविकार, कर्करोग, इत्यादी महिला रुग्णांशी संबंधित तसेच इतर सर्वसामान्य 90 ते 100 शस्त्रक्रिया तीन आठवडय़ांपासून प्रलंबित आहेत. तर जे. जे. रुग्णालयातील भूलतज्ञांच्या जागा रिक्त असल्याची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी मान्य केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List