12 अफेअर! 2 वर्षात मोडला संसार, 53 वर्षीय अभिनेत्री म्हणते, ‘मी चुकीच्या पुरुषांसोबत…’, आजही ‘ती’ खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत
झगमत्या विश्वात एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी आणि खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. मनिषा गेल्या अनेक वर्षांपासून एकटीच आयुष्य जगत आहे. पण वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्री खऱ्या प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे. 12 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आणि लग्नाच्या दोन वर्षांत घटस्फोट झाल्यानंतर, ‘मी कायम चुकीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला. माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेमच नाही…’ असं वक्तव्य खुद्द मनिषा हिने एका मुलाखतीत केलं होतं.
मुलाखतीत मनिषा म्हणाली होती, ‘मी कायम चुकीच्या पुरुषांवर विश्वास ठेवला आणि त्यांच्यावर प्रेम केलं. कायम विचार करायची की मी सतत असं का करत आहे. माझं काहीतरी चूकच आहे की मी फक्त सर्वात चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होते. त्यानंतर ज्या गोष्टींचा मला त्रास होऊ लागला त्यावर मी शांतपणे विचार केला.’
‘मी गेल्या 5 – 6 वर्षांपासून एकटीच आयुष्य जगत आहे. मला एका चांगलं रिलेशनशिप हवं आहे. असं रिलेशन ज्यामध्ये मला वाटेल आम्ही दोघं एकमेकांचा स्वीकार करत आहोत. एकमेकांसाठी प्रामाणिक आहोत. पुढे जाण्यासाठी आपल्याला काय शिकलं पाहिजे हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे. आपल्या प्रवासात आपण एकमेकांना साथ देऊ शकतो की नाही हे देखील महत्त्वाचे आहे.’
‘मला अशा व्यक्तीसोबत राहायचं आहे जो स्वप्न पाहतो. त्या व्यक्तीमध्ये महत्वाकांक्षा आणि काही उत्कटता असावी, कारण मी खूप भावनिक व्यक्ती आहे.’ असं देखील अभिनेत्री मुलाखचतीत म्हणाली होती.
12 सेलिब्रिटींसोबत रंगली मनिषा कोईरालाच्या नावाची चर्चा…
मनिषा कोईराला हिच्या नावाची चर्चा दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील झाली होती. पण नाना पाटेकर तेव्हा विवाहित होते. नाना पाटेकर यांच्याशिवाय मनिषाचं नाव विवेक मुशरान, डिजे हुसैन, सेसिल एंथनी , आर्यन वेद, प्रशांत चौधरी, क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी, राजीव मूलचंदानी क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत जोडण्यात आलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List