‘छावा’ पाहिल्यानंतर सूर्यकुमारकडून फक्त 3 शब्दात विकीचं कौतुक, क्रिकेटरची पोस्ट पाहून म्हणाल…
Chhaava: अभिनेता विकी कौशल याने ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याचा प्रयत्न केला आणि अभिनेत्याला यश देखील मिळालं. आज ‘छावा’ सिनेमा फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील अनेक विक्रम रचताना दिसत आहे. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये ‘छावा’ सिनेमाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ आजही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. फक्त चाहतेच नाही तर, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, सेलिब्रिटी देखील सिनेमा आणि विशेषतः विकीच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर विकी कौशल याचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूर्यकुमार याने सोशल मीडियावर एका पोस्ट करत ‘छावा’ आणि विकी कौशल याचं कौतुक केलं आहे.
सूर्यकुमार याने फक्त तीन शब्दात अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. सूर्यकुमार याने इन्स्टाग्राम स्टोरीवर सीनेमातील एका सीनचा फोटो पोस्ट करत विकीसाठी ‘भावा प्रॉपर छावा’ असं लिहिलं आहे. शिवाय फायर, लव्ह आणि Evil Eye हे इमोजी वापरलेले आहेत. सध्या सर्वत्र सूर्यकुमार याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, विकीने देखील सूर्यकुमार याची पोस्ट रीशेअर केली आहे.
‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याचा बोलबाला दिसत आहे. सोशल मीडियावर देखील सिनेमातीन अनेक सीन व्हायरल होत आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 2025 मधील सुपरहीट ठरलेला ‘छावा’ पहिला सिनेमा आहे. सिनेमाने अनेक हीट सिनेमांचे देखील रेकॉर्ड मोडले आहेत. फक्त भारतात नाही तर, जगभरात ‘छावा’ सिनेमा हीट ठरत आहे.
रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाने भारतात 411.46 कोटींचा गल्ला ओलांडला आहे. तर जगभरात हा आकडा 555.3 वर पोहोचला आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कोटींचा टप्पा गाठतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एवढंच नाही तर, सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत देखील चाहते आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List