राहा कपूरला कोणाचा धोका? आलियाने इंस्टाग्रामवरुन हटवले लेकीचे सर्व फोटो, घेतला मोठा निर्णय?
Alia Bhatt Shocking Decision: अभिनेत्री आलिया भट्ट हिची लेक राहा कपूर हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, खुद्द आलिया देखील लेकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण आता आलियाने इंस्टावरुन लेकीचे सर्व फोटो हटवले आहेत. सांगायचं झालं तर, अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर आलियाने राहा हिच्यासाठी देखील ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केल्याची चर्चा रंगली आहे.
आलियाने राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरुन डिलिट केले आहेत. त्यामुळे आता राहाचे फार कमी फोटो चाहत्यांना पाहता येणार आहेत. आलियाच्या या निर्णयानंतर चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला आहे. अनेकांना आलियाच्या निर्णयाचं समर्थन देखील केलं आहे.
आलियाचा हा अचानक निर्णय राहाच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे… असं देखील चाहते म्हणत आहे. सांगायचं झालं तर, 16 जानेवारी रोजी सैफ आणि करीना यांच्या घरात एक अज्ञात व्यक्त नकळत घुसला होता. त्याने मुलांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलांना हल्लेखोराच्या तावडीतून सोडवत असताना सैफ गंभीर जखमी झाला.
हल्लेखोराने सैफ सहा वार केले. त्यानंतर रक्त बंबाळ सैफ अली खान याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या घटनेनंतर सैफ – करीना यांनी देखील तैमूर आणि जेह यांच्यासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केली. आता आलियाने देखील राहा हिच्यासोबत दिसत नाही. त्यामुळे करीना आणि सैफ यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आलिया हिने देखील राहाचे सर्व फोटो सोशल मीडियावरून हटवले असल्याची चर्चा रंगली आहे.
आलिया भट्ट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आलिया बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असल्यामुळे लेक राहा कपूर देखील कायम चर्चेत असते. सध्या सेलिब्रिटी किडमध्ये राहा कपूर प्रसिद्ध आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता राहासाठी आलिया – रणबीर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
आलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List