Thane News- पोलीस व्हीआयपींच्या सिक्युरिटीत अडकले; ठाण्यात चोर माजले

Thane News- पोलीस व्हीआयपींच्या सिक्युरिटीत अडकले; ठाण्यात चोर माजले

अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या टेंभीनाक्याजवळील चरई भागात एका रात्रीत तब्बल १४ दुकाने चोरांनी फोडली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये मनुष्यबळ कमी असतानाही शेकडो पोलीस व्हीआयपीं आणि मिंधेंच्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांच्या सिक्युरिटीत अडकले आहेत आणि त्यामुळेच ठाण्यात चोर माजले असून घरफोड्या आणि दरोडे वाढले आहेत. दरम्यान, भरवस्तीत भुरट्या चोरांनी सलग १४ दुकाने फोडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

टेंभीनाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चरई भागात अनेक व्यावसायिक दुकाने आहेत. आज सकाळी व्यापारी दुकाने उघडण्यास आल्यानंतर त्यांना गाळ्याचे शटर उचकटल्याचे आढळले. एकूण १४ दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसले. या घटनेची माहिती व्यापाऱ्यांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. याप्रकरणी दुकानदार मालकांचे जबाब नोंदविले गेले आहेत. यातील आठ दुकानांमधून चोरट्यांनी २७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल लांबवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीत चोर कैद

१४ दुकानांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीत चोर कैद झाले असून चोरटा तरुण दुकानात वावरताना दिसत आहे. दरम्यान, नौपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हार्दिक पंड्यायला पुन्हा दंड हार्दिक पंड्यायला पुन्हा दंड
बंदीच्या शिक्षेमुळे पहिल्या सामन्यास मुकलेल्या हार्दिक पंड्याने यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी पाऊल ठेवले अन् पहिल्याच सामन्यात त्याला कारवाईला...
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यातील कामगार संघटना आक्रमक, 20 मे रोजी महाराष्ट्र बंदचा इशारा
ज्ञानसाधक वामनरावांच्या स्मृतींना उजाळा, जन्मशताब्दीनिमित्त जन्मगावी कुटुंबीयांनी जागवल्या आठवणी
ताडदेवकरांनी अनुभवला स्वागत यात्रेचा जल्लोष
IPL Points Table – सारेकाही निसटून चाललेय…
हरियाणाचे दुहेरी जेतेपद हुकले, किशोर गटात जिंकले, पण किशोरींच्या गटात उपविजेते
शिवमुद्रा, अष्टविनायक विजेते