होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप

होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप

होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त लावला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात रस्त्या रस्त्यावर चौकात पोलिसांच्या टीम बंदोबस्ताला जुंपण्यात आल्या आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पाळत ठेवण्यात आली असून पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे. रंगाच्या या सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणांवर एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि उपनगरात होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांना चांगली कंबर कसली आहे. मुंबईतील संवेदनशील विभागात अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एसटी आणि बेस्टच्या बसेसना सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच लोकल ट्रेन आणि मेट्रो तसेच मोनोरेलची खास काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुंबई आणि उपनगरात ०७ अपर पोलीस आयुक्त, १९ पोलीस उप आयुक्त,५१ सहायक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. तसेच १७६७ पोलीस अधिकारी आणि ९१४५ पोलीस अंमलदार बंदोबस्तकरीता तैनात करण्यात आले आहेत.

ड्रक एण्ड ड्राईव्ह मोहिम राबविणार

होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी अनेकदा अंगावर जबदस्तीने रंग उडविल्याने वादावादीचे प्रकार घडतात. त्यामुळे वादाचे पर्यावसन कोणत्याही धार्मिक तेढीत होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. महत्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, क्युआरटी टीम, बीडीडीएस टीम आणि होमगार्डसची तैनाती करण्यात आली आहे. तसेच मद्यप्राशन करुन दुचाकी आणि कार चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके तैनात करण्यात आले आहेत. वाहतूकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर, महिलांशी गैरवर्तवणूक करणाऱ्यांवर आणि अनधिकृत मद्य विक्री तसेच अंमली पदार्थांचे सेवन तसेच विक्री करणाऱ्यांवरच कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीसांनी दिले आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका
हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के....
होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर
पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक
मेहुणीवर जीव जडला, मग क्राईम शो पाहून साडूचा काटा काढला; एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत
Ratnagiri News – हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. कोकणात शिमगोत्सवाची धूम