रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला हा फ्लॅट जानेवारी 2025 भाड्याने दिला आहे. रोहित शर्मा याला भाड्यातून महिन्याला 2.6 लाख रुपये मिळणार आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रातून ही माहिती मिळाल्याचे ‘स्क्वायर यार्ड्स’ या वेबसाईटने म्हटले आहे. रोहित शर्माने भाड्याने दिलेला फ्लॅट मार्च 2013 मध्ये वडील गुरुनाथ शर्मासोबत घेतला होता. त्यावेळी त्याची किंमत 5.46 कोटी रुपये होती. मुंबईतील लोअर परळमध्ये हा फ्लॅट आहे. या ठिकाणावरुन वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स अन् नरीमन पॉइंटवर जाणेही सुविधाजनक असते.
रोहित शर्मा याचे हे अपार्टमेंट लोढा मार्कीज- द पार्कमध्ये आहे. हे अपार्टमेंट मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (लोढा ग्रुप)चा लग्झरी अपार्टमेंटमध्ये आहे. ते सात एकरमध्ये पसरले आहे. आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन रिकॉर्डनुसार या फ्लॅटचा कारपेट एरिया 1,298 वर्ग फूट आहे. त्यामध्ये दोन कार पार्किंग स्पेस आहे. घरभाड्याच्या या करारासाठी 16,300 रुपये स्टॉप ड्यूटी आणि 1,000 रुपये रजिस्ट्रेशन शुल्क लागले आहे. रोहित शर्मा याच्या वडिलांकडे याच अपार्टमेंटमध्ये आणखी एक फ्लॅट आहे. हा फ्लॅटसुद्धा 2013 मध्ये 5.70 कोटीत घेतला होतो. तो सुद्धा 2024 मध्ये भाड्याने दिला. त्याचे भाडे 2.65 लाख रुपये महिना ठरले आहे.
रोहित उत्तम गुंतवणूकदार
रोहित शर्मा याचे लोअर परळ भागात असणारा फ्लॅट खूप अलिशान आहे. त्यामध्ये अनेक सुविधा आहेत. स्विमिंग पूल, जिम, क्लब हाउस, मुलांसाठी खेळण्याचा एरिया 24 तास सिक्योरिटी या ठिकाणी आहे. हा भाग वांद्रे कुर्ला संकुल आणि नरीमन पॉइंटसारख्या व्यावसायिक केंद्राजवळ आहे. त्यामुळे या भागात भाड्याचे दर जास्त आहे. रोहित याचा दुसरा प्लॅट याच अपार्टमेंटमध्ये आहे. तो यापेक्षा जास्त भाड्याने दिला आहे. त्यामुळे या भागांत चांगली मागणी आहे.
रोहित शर्मा चांगल्या खेळाडूसोबत उत्तम गुंतवणूकदार आहे. रिअल इस्टेटमध्ये त्याने केलेल्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. आयपीएल सामन्यामधून रोहित शर्मा याला चांगले उत्पन्न मिळत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List