सक्सेसमुळे कपिल शर्मा घमेंडी झालाय? शोमधील सहकलाकार स्पष्टच बोलला
बॉलिवूडपासून ते टिव्ही मालिकांपर्यंत अनेक कलाकार हे त्यांना मिळालेल्या यशामुळे नक्कीच बदलताना दिसतात. काहीजण आपल्या त्याच अंदाजात राहतात आणि चाहत्यांची मने जिंकतात, तर काहीजण एकदमच शांत झालेले पाहायला मिळतात, मात्र काही कलाकारांच्या वागण्यामुळे अनेकदा चाहत्यांचे किंवा त्यांचे सहकलाकार नाराज होताना दिसतात. असंच काहीस एका अभिनेत्याबद्दलही बोललं जातं असतं.
कपिल शर्माचे वाद
या अभिनेत्याने गावावरून येऊन मुंबईत आपलं नशीब आजमावलं आणि तो आज एवढा यशस्वी आहे की त्याच्यावर संपूर्ण बॉलिवूड प्रेम करत. आज त्याच्या नावाने एक स्पेशल शो आहे. अर्थातच तुम्हाला ओळखायला आलं असेलच, कपिल शर्मा. होय कपिल शर्माबद्दल बऱ्याचदा वाद, किंवा सहकलाकारासोबत असभ्य वर्तन अशा अनेक तक्रारी, चर्चा होत असतात. कपिल शर्माच्या वर्तनावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले जातात. सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणानंतर कपिलवर घमेंडी असल्याचाही आरोप करण्यात येत आहेत.
आता त्याच्याच शोमधील एका सहकलाकाराने आता त्याच्याबद्दल एक स्टेटमेंट दिलं आहे. तो खरच यशामुळे घमेंडी झालाय का?यावर त्याच्याच शोमध्ये अॅक्ट करणारा अभिनेता तसेच कपिलचा सर्वात चांगला मित्र असणारा राजीव ठाकूरने यावर भाष्य केलं आहे.
कपिलच्या अहंकाराबद्दल आणि सुनील ग्रोव्हरशी झालेल्या भांडणाबद्दल वक्तव्य
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा भाग असलेल्या राजीव ठाकूरने कपिलच्या अहंकाराबद्दल आणि सुनील ग्रोव्हरशी झालेल्या त्याच्या भांडणाबद्दल वक्तव्य केले. राजीव म्हणाला की, “जर तो इतका यशस्वी झाला तर तो वेडा होईल. हा शो गेल्या 10-12 वर्षांपासून कपिलच्या मेहनतीमुळे सुरू आहे, त्याच्या अहंकारामुळे नाही. एका मुलाखतीत राजीव ठाकूर म्हणाला, ‘तो खूप दबावाखाली आहे आणि लोकांना ते समजत नाही. दोन ते अडीच तासांची स्क्रिप्ट कोणाला आठवेल? पण तो कधीही डगमगला नाही. कधीही अडखळला नाही, एकदाही नाही…. तो त्याच्या प्रत्येक एण्ट्रीत पंच शोधतो” असं म्हणत त्याने मित्राची बाजू घेतली.
“त्याच्या प्रयत्नांंचे हे फळ आहे”
राजीव ठाकूर पुढे म्हणाला, ‘परफॉर्म करण्याव्यतिरिक्त, त्याला पाहुण्यांचे स्वागत करावे लागते आणि त्यांना कम्फर्ट करावं लागतं.’ एवढंच नाही तर शोमध्ये काम करण्यासाठी चॅनेलच्या क्रिएटिव्ह टीमसोबत बसावं लागतं. जर हा शो 10 ते 12 वर्षांपासून यशस्वीरित्या चालू असेल तर ते त्याच्या प्रयत्नांचे आणि कठोर परिश्रमांचे फळ आहे. हे अहंकारामुळे घडत नाही. जर मी त्याच्याइतका प्रसिद्ध झालो तर मी वेडा होईन
त्यानंतर राजीव ठाकूरने कपिल शर्माचे कौतुक केले आणि म्हटले की त्याच्यासारख्या प्रसिद्धीला कोणीही हाताळू शकत नाही. राजीव म्हणाला, ‘कपिल शर्माच्या यशात माझा ५%ही वाटा नाही, तरीही मी अनेक वेळा चाहत्यांवर चिडतो.’ कपिल शर्मा त्याच्या चाहत्यांना किती प्रेमाने भेटतो ते तुम्ही बघायला हवे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List