संजय दत्तची पहिली पत्नी होती एवढी सुंदर; पाहून म्हणाल कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या ‘भूमी’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याला त्याची मुलगी त्रिशालाबद्दल काही पश्न विचारण्यात आले होते. की तिला अभिनय क्षेत्रात यायच असेल तर तुमची भूमिका काय असेल. तर तेव्हा “मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते” असं म्हणतं त्याने उत्तर दिलं होतं. त्याच्या या उत्तराने सर्वांनाट थक्क केलं होतं. तसं पाहायला गेलं तर त्रिशाला दत्त बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. ती लाइम लाइटपासून दूरच असते. मात्र त्रिशालाचे फॉलोअर्स सुद्धा एखाद्या सिनेस्टार पेक्षा कमी नाहीयेत.
संजय दत्तच्या पहिल्या पत्नी होती फारच सुंदर
त्रिशाला कुटुंबासोबतचे देखील अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. एकदा तिने शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला. हा फोटो होता संजय दत्तची पहिली पत्नी आणि त्रिशालाची आई रिचा शर्मा हिचा. या फोटोमध्ये रिचा शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोवर संजय दत्तची बहीण आणि पत्नी मान्यता दत्तनं सुद्धा कमेंट केली आहे.
रिचा शर्माच्या फोटोचा स्क्रिनशॉट सगळीकडे व्हायरल
त्रिशाला दत्त त्या स्टार किड्स पैकी आहे जे बॉलिवूड आणि लाइमलाइट पासून दूर राहणं पसंत करतात. त्यामुळे त्रिशालानं तिचं सोशल मीडिया अकाउंट सुद्धा प्रायव्हेट ठेवलं आहे. मात्र तिनं शेअर केलेल्या रिचा शर्माच्या फोटोचा स्क्रिनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. आई रिचाचा फोटो शेअर करताना त्रिशालानं लिहिलं होतं “मी आणि आई…1988 #RIPMommy” असं म्हणत तिने आईच्या आठवणीत तिच्या आईचा फोटो पोस्ट केला होता.

मान्यता दत्तनंही कमेंट केली
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये रिचानं आपल्या तान्हुल्या त्रिशालाला कुशीत घेतलेलं दिसत आहे. या फोटोमध्ये रिचा खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर मान्यता दत्तनंही कमेंट्स केल्या. ‘सुंदर’ तर प्रिया दत्तनं लिहिलं, ‘किती सुंदर, त्रिश आता ती स्वर्गातील एक एंजल आहे. जी नेहमी तुला पाहते. ती या जगात तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. देव तिच्या आत्माला शांती देवो’.
त्रिशाला अनेकदा आपल्या आईचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रिचा शर्मा आणि संजय दत्त यांनी 1987 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनतर रिचाला कॅन्सरचं निदान झालं आणि त्यातच तिचं निधन झालं. पण रिचाचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केलं आहे. तसेच कमेंटमध्ये असही म्हटलं आहे की, ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List