गरम वाफा, जीव गुदमरत होता, ड्रायव्हरचा उद्धटपणा; मराठी अभिनेत्याला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव, पोस्टद्वारे संताप व्यक्त

गरम वाफा, जीव गुदमरत होता, ड्रायव्हरचा उद्धटपणा; मराठी अभिनेत्याला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव, पोस्टद्वारे संताप व्यक्त

गेल्या काही दिवसांपूर्वी शिवशाही ही बस बरीच चर्चेत आली होती ती पुण्यात बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरून. या घटनेनंत सर्वत्र महाराष्ट्रात संताप पसरला होता. तसेच याच प्रकरणावेळी शिवशाही बसची नेमकी काय अवस्था आहे याबद्दलही बरीच चर्चा झाली. आता एका मराठी अभिनेत्यालाही शिवशाही बसच्या प्रवासाबद्दल असाच एक भयानक अनुभव आला आहे. या अभिनेत्याने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून हा अनुभव शेअरही केला आहे.

मराठी अभिनेत्याला आला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव 

एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याने शिवशाहीबाबतचा त्याचा एक वाईट अनुभव शेअर केला आहे. त्यामुळे त्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होते आहे.या अभिनेत्याचं नाव आहे ऋतुराज फडके. ऋतुराज फडकेने नुकताच शिवाशाही बसमधून प्रवास त्याला नेमका कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दलही त्याने सांगितलं आहे. जसं की बसमधला एसी,सर्वच प्रवाशांची झालेली तारांबळ, रिझर्वेशन अशा एक ना अनेक तक्रारी त्याने सांगितल्या आहेत.


गाडी बंद पडली अन्….

ऋतूराजने बसचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये सांगितलं आहे की, “आजचा दापोली – ठाणे, शिवशाही बसमधला अनुभव… बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं. एक 70 km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता. एसीमुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येत होत्या. ड्रायव्हर आणि कंडक्टरला तशी माहिती दिली. ड्रायव्हरने उत्तर दिलं एसी असाच असतो इकडे, तेव्हा गाडी रामवाडी बसस्टॉपवर होती. तिथे ड्रायव्हर गाडी दाखवू शकला असता, परंतु तिथून त्याने गाडी नेली आणि प्रायव्हेट धाब्यावरती थांबवली तिथे जेवणासाठी अर्धा तास गाडी थांबली. त्यानंतर तर अजूनच गरम वाफा यायला लागल्या, बसमध्ये म्हातारी माणसं होती, जीव गुदमरत होता, शेवटी गाडी कशीबशी पनवेलला आली. पनवेलला स्टॅन्डच्या बाहेरच गाडी बंद पडली.” असं म्हणत त्याने बस सुरु झाल्यापासूनचे सर्व अनुभव त्याने शेअर केले आहेत.

“ही दुरवस्था शिवशाही बसची”

पुढे तो म्हणाला,” कशी बशी ती बस स्टँडमध्ये नेली आणि सगळ्यांना उतरायला सांगितलं. मी पनवेलमध्येच उतरून कॅब करून घरी येणार होतो आणि आलो सुद्धा. बस अंदाजे दुपारी अडीच पावणेतीन वाजता ठाणे डेपोत पोहोचते. आश्चर्य करणारी गोष्ट अशी मला एक रात्री आठ वाजता फोन आला, तुम्ही विसापूर स्टॉपवर चढलात ना? दापोली-ठाणे बस मध्ये होतात ना? मी म्हटलं हो. डेपोतून समोरचा व्यक्ती म्हणाला, मग बस कुठे आहे बस अजूनपर्यंत ठाणे डेपोत आलेली नाहीये. ही दुरवस्था शिवशाही बसची.” असं म्हणत ऋतूराजने त्याला आलेला शिवशाहीचा हा भयानक अनुभव सांगितला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मोठी घोषणा फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र...
कोणाचाही फोन येताच रणवीर सिंग काय करायला लागतो? दीपिकची इंस्टा पोस्ट चर्चेत
तमन्ना भाटियाचा ‘हा’ हॉरर चित्रपट पाहण्याची चूक करू नका; डोकं धरून बसाल; तमन्नाही यामुळे झालीये ट्रोल
कतरिना फारच धार्मिक; कर्नाटकातील या मंदिरात तब्बल 4 ते 5 तास केली ‘सर्प संस्कार पूजा’
Chandrapur News – चंद्रपूर जिल्ह्यातील 598 गावातील पाणी प्रदूषित, 393 नमुने फ्लोराइडयुक्त आढळले
महायुती सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
पुन्हा दुखापती झाली तर जसप्रीत बुमराहचं करिअर संपुष्टात येईल, शेन बॉन्डचं मोठं विधान