आठ वर्षांनी लहान हिंदू अभिनेत्याशी लग्न; रमजानबद्दल मुस्लीम अभिनेत्री म्हणाली “मी एकटीच..”

आठ वर्षांनी लहान हिंदू अभिनेत्याशी लग्न; रमजानबद्दल मुस्लीम अभिनेत्री म्हणाली “मी एकटीच..”

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम किश्वर मर्चंटने 2016 मध्ये अभिनेता सुयश रायशी लग्न केलं. किश्वर मुस्लीम आणि सुयश हिंदू असल्याने या दोघांचं हे आंतरधर्मीय लग्न होतं. लग्नानंतर किश्वर दोन्ही धर्मांचं पालन करताना दिसतेय. नुकतीच तिने सना खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी किश्वर तिच्या हिंदू सासर आणि रमजानच्या महिन्यात रोजाचं पालन कसं करते, याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सना खानसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री होती, मात्र धर्माचं कारण देत तिने काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्र सोडलं आणि मुफ्ती अनस सय्यदशी निकाह केला. लग्नानंतर ती तिच्या युट्यूब चॅनलवर पॉडकास्ट मुलाखती घेताना दिसते. अशाच एका एपिसोडमध्ये किश्वर पाहुणी म्हणून आली होती.

रमजानच्या महिन्यातील आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना किश्वर म्हणाली, “मी लहान असताना आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहायचो. आमचं घर माहीमच्या दर्ग्याजवळच होतं. त्यामुळे रात्रभर सहरीचं जेवण बनायचं. तो माहौलच वेगळा होता. सहरीसाठी संपूर्ण कुटुंब पहाटे उठायचं. आता सासरीसुद्धा मी रोजाचं पालन करते. पण इथे मी एकटीच पहाटे उठते आणि सहरी करते. कधी कधी तर सहरीशिवाय रोजाचा उपवास करते. आता गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत, पण लहानपणीच्या आठवणी खूप चांगल्या होत्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

सासरी दोन्ही धर्मांचं पालन करत असल्याचं किश्वरने पुढे सांगितलं. “माझं लग्न जरी हिंदू धर्मात झालं असलं तरी आम्ही ईद, दिवाळी, ख्रिसमस सर्व सोबत सेलिब्रेट करतो आणि हे खूप कमाल आहे. रमजानबद्दल माझ्या मुलाला फारसं काही माहीत नाही. कारण अजून तो खूप लहान आहे. पण त्याला अजान आणि नमाज यांबद्दल माहीत आहे. आजोबांना नमाज पठण करताना तो पाहतो. शुक्रवारी जर त्याचे आजोबा त्याला शाळेत न्यायला आले नाहीत, तर त्याला समजतं की आज नमाज आहे”, असं ती पुढे म्हणाली.

किश्वर आणि सुयशबद्दल बोलायचं झाल्यास, या दोघांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे. किश्वर तिच्या पतीपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. किश्वरने ‘हिप हिप हुर्रे’, ‘एक हसीना थी’, ‘इतना करो ना मुझसे प्यार’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘कैसी ये यारियाँ’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने 2015 मध्ये ‘बिग बॉस’च्या नवव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण, मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा लावला छडा, चौघांना ठोकल्या बेड्या
मुंबई, वनराई पोलिसांनी दीड महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल केली आहे आणि एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात...
‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांचा रोख काय?
संजय दत्तची पहिली पत्नी होती एवढी सुंदर; पाहून म्हणाल कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य…, अभिनेत्रीच्या वडिलांचं मोठं वक्तव्य
लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’
गरम वाफा, जीव गुदमरत होता, ड्रायव्हरचा उद्धटपणा; मराठी अभिनेत्याला शिवशाहीच्या प्रवासाचा भयानक अनुभव, पोस्टद्वारे संताप व्यक्त
नवऱ्याला परक्या स्त्रीसोबत पाहून अभिनेत्रींना ‘या’ बसला मोठा धक्का, चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण