37 वर्षांनी गोविंदा आणि सुनीताचा होणार ‘ग्रे डिव्होर्स?’ नक्की काय आहे संकल्पना वाचा

37 वर्षांनी गोविंदा आणि सुनीताचा होणार ‘ग्रे डिव्होर्स?’ नक्की काय आहे संकल्पना वाचा

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडचा हीरो नंबर वन गोविंदा भलेही रुपेरी पडद्यापासून लांब असला तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. आता अभिनेत्याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदा आणि सुनीता लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहेत. या बातमीने चाहत्यांना धक्काच बसला आहे. गोविंदा आणि सुनीताचा ग्रे डिवोर्स होत आहे. आता ही ग्रे डिव्होर्स संकल्पना काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया…

सुनीता आणि गोविंदा हे गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळे राहात आहेत. नुकताच सुनीताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचे देखील समोर आले आहे. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर दोघे वेगळे होत असल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. गोविंदा ६१ वर्षांचा आहे तर सुनीता ५७ वर्षांची. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाला ग्रे डिव्होर्स असे म्हणत आहेत.

ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?

ग्रे डिव्होर्स म्हणजे नवरा आणि बायकोचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि दोघांच्या लग्नाला बरीच वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच नवरा बायको ऐन उतारवयात घटस्फोटाचा निर्णय घेत आहेत या संकल्पनेला ‘ग्रे डिव्होर्स’ असे म्हणतात. दोघांनी एकमेकांसोबत अर्ध आयुष्य जगले आहे. त्यामुळे गोविंदा आणि सुनीताचा जर घटस्फोट झाला तर तो ग्रे डिवोर्स म्हणून ओळखला जाईल.

सुनीताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती गोविंदासोबत राहत नाही. सुनीताने सांगितले होते की ते बऱ्याच वेळा वेगळे राहतात. सुनीता एका फ्लॅटमध्ये मुलांसह राहते. तर गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. याशिवाय सुनीता म्हणाली होती की, ‘कोणत्याही माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. लोक सरड्यासारखे रंग बदलतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. तो कुठे जाईल? पूर्वी मी कुठेही जात नसे आणि आता मला माहित नाही…’ सुनीता म्हणाली पुढे म्हणाली होती की मी पूर्वी खूप सुरक्षित होते. पण मी आता नाही. वयाची साठी ओलांडल्यानंतर लोक विचित्र वागायला लागतात. गोविंदाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. तो काय करतोय कुणास ठाऊक. मी गोविंदाला सांगितले की तू ६० वर्षांचा झाला आहेस, हट्टी होऊ नकोस. पण तो काही ऐकत नाही.’

गोविंदा आणि सुनीताने १९८७ साली लग्न केले होते. दोघांनीही अगदी कमी वयात लग्न केले होते. त्यावेळी सुनीला केवळ १८ वर्षांची होती. सुनीता आणि गोविंदाला दोन मुले आहे. मुलीचे नाव टीना आहे तर मुलाचे नाव यशवर्धन आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर