Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ

Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंबड-भालगाव रोडवर एका पुलाखाली चारही पाय तोडलेल्या एका नर बिबटयाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबड-भालगाव रोडवर शंकर राजाराम भोजने यांच्या गट नं. 121 च्या शेताजवळ मंगळवारी (25 फेब्रुवारी 2025) सकाळी 11 वाजता पुलाखाली एक बिबट्या सडलेल्या अवस्थेत गुराख्याला दिसून आला. त्यांनी तत्काळ सदर बाब वन विभागाच्या कर्मचार्‍यास कळवली. त्यावरून वन परीक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा तसेच पोस्टमॉर्टम करून बिबट्यावर अंत्यसंस्कार केले. बिबटया मारल्याची माहिती शहर व परिसरात पोहचल्याने लोकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.

सदर बिबट्या बाबत वन परीक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी हा अडीच-तीन वर्ष वयाचा नर बिबट्या आहे. तसेच त्याची बॉडी सडली असल्यामुळे त्याला नुकतेच काही दिवसांपूर्वी मारलेले असावे. तसेच तो कोणीतरी मारून या ठिकाणी आणून टाकला असावा, असा अंदाज व्यक्त केला. तसेच या बिबट्याचे चार पंजे कापलेले आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच
बॉलिवूडचे  सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या जीवनाविषयीच्या पोस्टमुळे अनेकांच्या मनात कालवाकालव झाली....
लहान मुलांमध्ये स्टॉमिना वाढवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश
लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी
सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन ‘या’ लॉन्च, मिळणार ८ जीबी रॅम मिळेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी