शाहरूखचा ‘तो’ हिट चित्रपट, ज्यामुळे मुंबईतील अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली होती? कारण जाणून आश्चर्यच वाटेल
बॉलिवूडमधील असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. पण त्यांना बनवण्याची प्रोसेसही तेवढी स्ट्रगलची होती. असाच एक चित्रपट ज्याने बॉक्सऑफिसवर तुफान चालला, प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं होतं. पण हा चित्रपट बनवतानाची प्रोसेस तेवढीच स्ट्रगलची होती. हा चित्रपट म्हणजे सुपरस्टार शाहरुख खानचा ‘देवदास’ हा चित्रपट
मुंबईत अनेक लग्ने पुढे ढकलण्यात आली होती
या चित्रपटाच्या प्रदर्शनाला जवळजवळ 2 दशके झाली आहेत, पण आजही त्याची कहाणी लोकांच्या हृदयात आहे. अलीकडेच, ‘देवदास’साठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करणारे विनोद प्रधान यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, मुंबईत अनेक लग्ने पुढे ढकलण्यात आली होती. होय, याचं कारण ऐकून नक्कीच तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. कारण त्यावेळी मुंबईत उपलब्ध असलेले सर्व जनरेटर ‘देवदास’च्या सेटवर आणण्यात आले होते.

‘देवदास’ हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता आणि चित्रपटच्या सेटची भव्यता हे दखील या चित्रपटाचं आकर्षण आहे. भन्साळी त्यांचे चित्रपट बनवताना प्रत्येक बारकाव्याची विशेष काळजी घेत असतात. ‘देवदास’ मध्ये, प्रचंड मोठे वाडे, झुंबर आणि प्रत्येक देखावा विशेष प्रकाशयोजनेने सजवण्यात आला होता. त्या वेळी शूटिंगसाठी शक्य तितकी जास्त वीज लागत असे.
खूप जनरेटर वापरावे लागले
एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विनोद प्रधान म्हणाले, ‘एक काळ असा होता की मुंबईत लग्ने थांबवावी लागतील किंवा पुन्हा वेळापत्रक निश्चित करावे लागेल कारण शहरातील सर्व जनरेटर संपले होते. ती खूप मोठी जागा होती आणि ती जागा उजळवण्यासाठी मला खूप जनरेटर वापरावे लागले. जर एखाद्या दिग्दर्शकाने तुम्हाला साथ दिली तर तुम्ही तुमचे सर्वोत्तम देऊ शकता.” असं म्हणत त्यांनी सेटसाठी करावा लागणाऱ्या स्ट्रगलबद्दल सांगितलं.
लाइटिंगमुळेच चित्रपट बनवण्यास वेळ लागला
विनोद प्रधान पुढे म्हणाले, “‘खरं सांगायचं तर, सेट्स इतके मोठे असतील हे मला माहित नव्हतं. खरंतर, आम्हाला शूट करण्याची घाई नव्हती. इतर चित्रपटांमध्ये, आम्ही एका दिवसात 15 ते 20 शॉट्स घ्यायचो. कधीकधी 40 देखील घेतलेले आहेत, पण देवदासमध्ये आम्ही फक्त 3 ते 4 शॉट्स घेतले. विनोदने असेही सांगितले की, वीजेमुळे चित्रपट बनवण्यास उशिर लागत होता.

तसेच पुढे म्हणाले ‘लाइटिंगमुळेच चित्रपट बनवण्यास इतका वेळ लागला. पारोचं घर पूर्ण काचेनं सजवण्यात आलं होतं. असा सेटवर लाइटिंग करणे नक्कीच सोपे नव्हते. तसेच, मी खूप वेगाने काम करत नाही आणि मला एखादा सेट योग्यरित्या प्रकाशित करण्यासाठी वेळ लागतो. चंद्रमुखीच्या घरीही अशीच परिस्थिती होती. तो एक किलोमीटर लांब सेट होता आणि जेव्हा मी माझ्या टीमसोबत पहिल्यांदा तो पाहिला तेव्हा मी थक्क झालो. आम्ही सेटवर फिरत होतो, इथे हा सीन कसा शूट करायचा याचा विचार करत होतो.
संजय लीला भन्साळींचे कोतुक
विनोद म्हणाले, ‘दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मला सांगितले होते की तडजोड करू नका आणि फक्त चांगले काम करा. एक काळ असा होता जेव्हा ‘देवदास’साठी पैशांची कमतरता होती. तरीही संजयने मला सांगितले की कोणत्याही गोष्टीत तडजोड करू नको. मला आश्चर्य वाटलं कारण मला वाटलं होतं, की तो मला लवकर शूट पूर्ण करण्यास सांगेल, पण मला त्याचे म्हणणे आवडले आणि पण देवदास नंतर आम्ही इतर कोणत्याही चित्रपटावर काम केले नाही हे दुर्दैव आहे. असं म्हणत विनोद यांनी संजय लीला भन्साळी आणि संपूर्ण सीनचं कौतुक केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List