मुंबई आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रातून तुटेल व अदानीच्या घशात जाईल – आदित्य ठाकरे

मुंबई आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रातून तुटेल व अदानीच्या घशात जाईल – आदित्य ठाकरे

विधानसभा निवडणुकीनंतरची वाटचाल आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दणदणीत आणि खणखणीत असे निर्धार शिबीर मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात होत आहे. यावेळी मुंबईची अवस्था या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी ”मुंबई आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रातून तुटेल व अदानीच्या घशात जाईल, असा सावध इशारा मुंबईकरांना दिला आहे.

”मुंबई आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रातून तुटेल व गुजरातच्या नाही तर फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील. तिथे लढणं गरजेचं आहे. जिंकणं गरजेचं आहे. तिथे आपल्याला जात पात धर्म विसरून शिवसेनेच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे. ही मुंबई आपल्याला आपली ठेवायची असेल तर आपल्याला लढणं जिंकणं गरजेचं आहे. सगळ्यात काळोखी रात्र ही सुर्योदयांच्या आधीची असते. आपला सुर्योदय होणार आहे व तो आपण आणणार आहोत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– मागच्या वर्षी काही महत्त्वाच्या निवडणूका झाल्या. आपण जिंकलो. जे सत्ताधारी सांगत होते की आपण चारसो पार जाणार. 2014 मध्ये आपण एकत्र होतो तेव्ह त्यांनी देशाला एक स्वप्न दाखवलेलं की अच्छे दिन आयेंगे. त्यावेळी मित्र पक्षही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे ते 282 जागा जिंकले.

– 2019 ला विधानसभा निवडणूकीत ते शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत आले आम्हाला वचन दिलं पण निवडणूकीनंतर त्यांनी ते वचन मोडलं. त्या शब्दापोटी आपण एकत्र लढलो होतो पण तो शब्द त्यांनी मोडला. खोटं बोलले. 2019 ला शिवसेना सोबत होती म्हणून 300 पार गेले.

– यंदाही त्यांच्या चेहऱ्यावर सत्तेचा माज दिसत होता. त्यांना संविधान बदलायचं होतं. भाजपचं संविधान लादायचं होतं. 2014 ला चारशे पार जाणार म्हणून बोलत होते. पण आपण त्यांना रोखलं आपण इंडिया आघाडी म्हणून जिकंलो, आपण 240 ला अडवलं. देशभरात देखील 70 सीटमध्ये घोटाळा केला. नाहीतर त्यांचं सरकार बनत नव्हतं.

– विधानपरिषदेच्या ज्या दोन निवडणूका बॅलेट पेपरवर झालं त्या आपण जिंकलो. सिनेटची निवडणूक जिंकलो. त्यातही शिवसैनिक म्हणून एकटे लढलो त्यात दहाही जागा जिंकलो.

– विधानसभेत शंभर टक्के जिंकू असं वाटत होतं. भ्रष्टाचार, अदानी, उद्योगधंदे पळवले हे सगळे मुद्दे लोकांसमोर होते. पण निवडणूकीत व्होटर फ्रॉड झालाय. तीन निवडणूका जिंकलो

– 202२ ला आपलं सरकार पाडलं. महाराष्ट्राला गद्दारीची किड लावली. त्यावेळी या गद्दारांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की आपलं सरकार बसतंय. पण यावेळी सरकार बनत होतं त्यावेळी सत्ताधारीही शॉकमध्ये होते. अनेक लोकं मला सांगतात आम्हाला आमचं सरकार आलं कसं असा विचार पडतो.

– मुंबई आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रातून तुटेल व गुजरातच्या नाही तर फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील. तिथे लढणं गरजेचं आहे. जिंकणं गरजेचं आहे. तिथे आपल्याला जात पात धर्म विसरून शिवसेनेच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे. ही मुंबई आपल्याला आपली ठेवायची असेल तर आपल्याला लढणं जिंकणं गरजेचं आहे.

– आपण मुंबईचा सर्वोत्तम विचार करून काम करतो. या कालिदास सभागृहाच्या नुतणीकरणाच्या वेळी देखील आपण बऱ्याच कलाकारांना इथे बोलावून नुतणीकरण कसं झालं पाहिजे ते विचारलं होतं. आपण जे करतो ते चांगलंच झालं पाहिजे. सर्वोत्तमच झालं पाहिजे असा आपला विचार असतो.

– महाराष्ट्रात अनेक गोष्टींची कामांची आपण सुरुवात केली व उद्घाटनं भलतीच व्यक्ती करतायत. मुंबई पुणे रस्त्याची कल्पना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती. पण त्याचं उद्धाघन समोरच्या व्य्क्तीने केलं. सी लिंक देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं. 1999 साली आपण भूमीपूजन केलं होतं. उद्घाटन पुढच्या सरकारने केलं. कोस्टल रोडचंही तसंच. मी चॅलेंज करतो की माझ्या समोर भाजप मंत्र्याला बोलवा आणि मला बोलवा. मी कोस्टल रोडच्या इंच नी इंचची माहीती देऊ शकेन. मी प्रत्येक आठवड्यात मी त्याची माहिती घ्यायची.

– 2014 साली अर्धा कोस्टल रोड एमएसआरडीए कडे दिलं. तेव्हापासून हे खातं कोणाकडे आहे हे सर्वांना माहित आहे. 2014 पासून एकही पिलर लागलेला नाही. हे त्यांचं काम. आणि उद्धव ठाकरेंनी पालिकेच्या माध्यमातून कोस्टल रोडचं जे काम हाती घेतलं ते आज आपलं सरकार असतं तर काम पूर्ण झालं असतं. कोस्टल रोडची संकल्पना 2012 ला उद्धव ठाकरेंनी मांडली. 2017 च्या आधी आपण त्याच्या परवानगीसाठी केंद्रांकडे दोनदा गेलो. मी स्वत: जावडेकरांना भेटलो. आज जर आपलं सरकार असतं तर २०२३ पर्यंत आपण पूर्ण कोस्टल रोड बनवून दिला असता.

– अटल सेतू 2023 मध्ये पूर्ण व्हायला होता. पहिला गर्डर पडल्यानंतर आपली सत्ता असेपर्यंत आपण 82 टक्के काम पूर्ण झालं होतं. वरळी नाव्हाशेवा आपलं सरकार असेपर्यंत 48 टक्के काम पूर्ण झालं होतं. यांचं सरकार आल्यापासून दहा टक्केही पुढे गेलेलं नाही.

मुंबईत महापौर आपलाच का असावा ते सांगतोय. –

रस्ता घोटाळा – सगळ्यांची एकच तक्रार आहे की मुंबई पूर्ण खोदून ठेवली आहे. २०१५ ला मुंबईत रस्ता घोटाळा होतोय. ६ हजार कोटींचे टेंडर निघाले होते. एकनाथ शिंदेच्या पाच मिंत्रांना मुंबईचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. तेव्हा मुंबई खड्डेमुक्त करू म्हणत होते तीन वर्ष झाली मुंबई खड्डेमुक्त झालेली नाही. पुढच्या पाच दिवसांत पालिकेने एक हजार कोटी रुपये कमी केले. ते मुंबईचे पैसे मी वाचवले. तीन वर्षात फक्त 26 टक्के काम झालंय. माझी लढाई मुंबईला लुटणाऱ्या भाजप-मिंध्यांसोबत आहे.

2 – मुंबई महापालिकेची स्वत:ची स्पेशालिटी हॉ़स्पिटल आहेत. त्याच पालिकेचं कोव्हिडमध्ये वर्ल्ड हेल्थऑरगनायझेशनने कौतुक केलं होतं. त्याच महापालिकेच्या रुग्णालयांची आजची अवस्था पहा. खेकड्या मंत्र्यांनी आरोग्य विभागात घोटोळा केला. आज औषधं नाहीत, एक्सरे नाहीत, डॉक्टरांना सांगितलं जातं की आमच्याकडे पैसे नाहीत. त्यासोबत स्ट्रीट फर्निचरचा भयंकर घोटाळा झाला आहे.
सॅनिटर वेंडिंग घोटाळा. आरोग्य खात्याची अवस्था भयंकर झाली आहे.

३ मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतो. मुंबईची आर्थिक कोंडी करतायत. सगळे मोठ मोठे मुख्यालय गुजरातला पाठवले आहेत. वर जे बसलेले आहेत त्यांना दोनच राज्य महत्त्वाच्या आहेत एक स्वत:च्या नाकाखाली ठेवले आहे तिथे द्या नाहीतर गुजरातला पाठवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब मुंबई बंदरचे जेतेपदावर शिक्कामोर्तब
यजमान मुंबई बंदरने दीपक सोरेनच्या एकमेव गोलच्या जोरावर अखिल हिंदुस्थानी मुख्य बंदरे हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत एसएमपीए (कोलकाता)संघाचा 1-0 ने...
उद्धव ठाकरे यांचे दोन शिलेदार शिंदे गटात; ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा मोठा धक्का
टीम इंडिया चॅम्पियन! 25 वर्षानंतर बदला पूर्ण, न्यूझीलंडला पराभूत करत रोहितसेनेने जिंकले विजेतेपद
दापोली मतदार संघाला ताकद देणार, आमदार भास्कर जाधव यांचा निर्धार
फटे लेकिन हटे नही! संजय राऊत यांनी सांगितला शिवसैनिकांच्या बळाचा मंत्र
एकदा झालेली ती चूक परत होता कामा नये! संजय राऊत यांचं शिवसैनिकांना आवाहन
“…तर संपूर्ण युक्रेनची फ्रंटलाइन कोसळेल”, एलोन मस्क यांचा इशारा