“तुमच्या प्लेटमध्ये लाडू वाढले तर तुम्ही खाणार नाही का?” उदित नारायण यांच्या किस व्हिडिओवर अभिनेत्रीचे वादग्रस्त विधान
ज्येष्ठ गायक उदित नारायण अलीकडेच एका कॉन्सर्टमध्ये एका मुलीच्या ओठांवर जबरदस्तीने किस घेतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते चांगलेच वादात सापडले. व्हिडिओ समोर आल्यानंतर उदित नारायण यांच्यावर प्रचंड टीका झाली. आता या प्रकरणावर एकेकाळची प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री कुनिका सदानंद यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाला की ” सर्वांनी त्या माणसावर आरोप केले पण जिच्यासोबत हे घडलं ती मुलगी पण तिथेच होतीना. यादरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केलं. त्या म्हणाल्या की, “जर तुमच्या ताटात लाडू वाढले तर तुम्ही ते खाणार नाही का?”
कुनिका सदानंदने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत
कुनिका सदानंदने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील बऱ्याच घटनांबद्दलही सांगितले. यादरम्यान, जेव्हा तिला उदित नारायण यांच्या त्या वादाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “उदित नारायणजींनी किसं केलं, ते ठीक होते पण त्यांनी ओठांवर नाही तर गालावर किस करायला हवं होतं” असंही विधान तिने केलं आहे. तिची ही दोन्ही विधानं सध्या चर्चेत आहेत.
कुनिकाने घेतली उदित नारायण यांची बाजू
यानंतर कुनिका सदानंदने मुलाखतीत म्हटलं की, म्हणाली की हा व्हिडिओ 2 वर्षे जुना आहे. पण जेव्हा मुलाखत घेणाऱ्याने तिला म्हटलं की, हा व्हिडिओ आत्ताचाच आहे, तेव्हा कुनिका म्हणाली, “मला खात्री बसत नाही. पण ती मुलगीही पुढे आली आहे. मग तुम्ही त्या पुरूषावरच दोष का दिलात, की त्याने तिला का किस केलं म्हणून?”
“पुरूषावरच कसा काय दोष टाकू शकता?”
यानंतर कुनिका सदानंद म्हणाली की हा व्हिडिओ 2 वर्षे जुना आहे. पण जेव्हा मुलाखत घेणाऱ्याने तिला दुरुस्त केले आणि सांगितले की व्हिडिओ अलीकडचा आहे, तेव्हा कुनिका म्हणाली, “मला खात्री अशी नाहीये. पण ती मुलगीही पुढे आली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त त्या एकट्या पुरूषावरच कसा काय दोष टाकू शकता?” असा सवालही त्यांना यावेळी उपस्थित केला आहे.
“अनेक महिला मला ट्रोल करतील”
तसेच त्या पुढे म्हणाल्या “स्टेज शो करणे ही एक वेगळीच भावना असते. तुम्ही खूप उत्साहित असता. प्रेक्षक तुम्हाला खूप काही तरी प्रतिक्रिया देत असतात. तुम्हाला एका वेगळ्याच प्रकारच्या नशेत असता. जसं की जेव्हा तुम्ही दारू प्यायलेले असता तेव्हा कधीकधी तुम्ही अशा डान्स स्टेप्स करता, तुम्हाला माहितही नसते की तुम्ही असं नाचू शकता. तुमच्या काही नोट्स अशा निघतात. काही सादरीकरणे अशीच घडतात. मला माहित आहे की अनेक महिला मला ट्रोल करतील, म्हणतील की तिला असं बोलायला काही वाटतं नाही का? पण तरीही मला असंच म्हणावंसं वाटतं की तुम्ही त्या माणसाला का दोष देत आहात, तुम्ही स्वतः काय करत होता तेही पहावं.” असं म्हणत कुनिकाने उदित नारायण यांची बाजू घेतली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List