लोकल प्रवाशांनो सावधान, कसारा येथे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेचा शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी गर्डरची उभारणी करीत आहे. त्यामुळे या सेक्शनमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी असे तीन पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी शनिवारी रात्री आणि रविवारी प्रवास करताना लोकल गाड्यांची स्थिती जाणूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मध्य रेल्वे कसारा रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करीत आहे. या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने लागोपोठ तीन पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉवर ब्लॉकच्यामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. शनिवार दिनांक ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी कसारा स्थानकावर आरओबी गर्डर ( टप्पा-१ ) च्या लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे कसारा स्थानकावर शनिवार दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी आरओबी गर्डरच्या (टप्पा-१) लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे.
पहिला ब्लॉक शनिवार दि.०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर असणार आहे.
दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवार दि. ०९.०३.२०२५ रोजी सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० आणि दुपारी ४.०० ते संध्याकाळी ४.२५ पर्यंत कसारा स्थानक हद्दीतील अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर असणार आहे.
ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांचे शार्ट टर्मिनेशन-ओरिजिनेशन
शनिवार दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.३४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-११) आसनगाव येथे शॉर्ट टर्मिनेट ( रद्द ) केली जाणार आहे.
रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी दुपारी १.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कसारा लोकल (एन-१९) कल्याण येथे शॉर्ट टर्मिनेट ( रद्द ) केली जाईल.
कसारा येथून शनिवारी दि. ०८ मार्च २०२५ आणि रविवारी दि.०९ मार्च २०२५ सकाळी ११.१० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-१६) लोकल ट्रेन आसनगाव येथून सुटणार आहे.
कसारा येथून रविवार दि.०९ मार्च २०२५ रोजी दुपारी ०४.१६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-२६) लोकल कल्याण येथून सुटणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List