मोठी बातमी! हरिण मारणाऱ्या खोक्याला लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी? काय केली मागणी

मोठी बातमी! हरिण मारणाऱ्या खोक्याला लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी? काय केली मागणी

मोठी बातमी समोर आली आहे, आज पोलीस आणि वनविभागाच्या पथकाकडून खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झाडाडडती घेण्यात आली. त्याच्या घरामध्ये जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारं साहित्य फासे वगेरे सापडले आहेत. दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे. खोक्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे.

धमकीमध्ये नेमकं काय म्हटलं?  

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. बिश्नोईच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं.  या फेसबुक अकाउंटवरून खोक्या उर्फ सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

उद्या शिरूर बंदची हाक 

खोक्या उर्फ सतीश भोसले याचे एक एक कारनामे आता बाहेर येत आहेत. तो फरार झाला आहे.   शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते.  खोक्याने ढाकणे यांच्या शेतात हरिणाची शिकार करण्यासाठी जाळे लावले होते. या जाळ्यात एक हरिण अडकलं, त्याला वाचवण्यासाठी ढाकणे कुटुंब समोर आले असता, वडील आणि मुलाला खोक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये महेश ढकणे याचे आत दात पडले तर वडील दिलीप ढाकणे यांच्या फासोळ्या मोडल्या. या मारहाणीमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या प्रकरणात आता येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. तसेच उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. खोक्या अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागला नाही? असा सवला येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्याचे नेतृत्व सेरेना म्हसकर, आर्यन पवारकडे, 34वी किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा राज्याचे नेतृत्व सेरेना म्हसकर, आर्यन पवारकडे, 34वी किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
येत्या 27 ते 30 मार्चदरम्यान होणाऱया 34 व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे नेतृत्व मुंबई...
हमासच्या वरिष्ठ राजकीय नेत्यासह 19 पॅलेस्टिनी ठार
मीरा-भाईंदर युवासेना चषकावर एनपी स्पोर्ट्सची मोहोर
अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरात विजेता
कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं मिंधे गटाला झोंबलं, सेटची केली तोडफोड
कुणाल कामरा याच्या सेटची तोडफोड, शिवसैनिकांचा अंधेरीच्या हॉटेलात राडा
एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ असे गाणे, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले ‘कुनाल की कमाल’, आता शिवसेना कॉमेडियनविरोधात आक्रमक