विधानसभेत राम कदम अन् भास्कर जाधव यांच्यात ‘तू तू मैं मैं’

विधानसभेत राम कदम अन् भास्कर जाधव यांच्यात ‘तू तू मैं मैं’

Maharashtra Budget Session 2025: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे प्रकरणावरुन सत्ताधारी अडचणीत आले. सभागृहात विरोधक कमी असले तरी आक्रमक होत आहे. विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु झाली. त्या भाषणास पाठिंबा देत आमदार राम कदम यांनी मुंबईचे मुद्दे मांडले. त्यावेळी भाजप आमदार राम कदम आणि शिवसेना उबाठा नेते भास्कर जाधव यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाली. सभागृहात उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले. उद्धव ठाकरे सभागृहात नसताना नाव का घेतले? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी राम कदम यांनी मी माजी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले असे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले अन् गोंधळ

राम कदम म्हणाले, मुंबईत कोरोना काळात अकरा हजार मुडदे पडले. त्याला कारण शिवसेना उबाठा होते. तेव्हाच सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री सहायता निधी उद्धव ठाकरे यांनी का बंद केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री सहायता निधी त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरु केला. कोरोना काळात मुंबईत कोव्हीड येण्यापूर्वी एकही व्हेंटीलेटर नव्हते. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली की, आपण व्हेंटीलेटरची व्यवस्था करा. त्या वेळच्या सरकारने ही व्यवस्था केली असती तर मुंबईत ११ हजार लोकांचा मृत्यू झाला नसता. उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्यावर बोलावे ही शिवसेना उबाठाची गरज आहे. त्यांना दाखवावे लागते, असा टोला राम कदम यांनी भास्कर जाधव यांना लगावला.

उबाठा शिवसेनेकडे अनेक वर्षे मुंबई पालिका होती. डांबराचे रस्ते करायचे कारण यात त्यांना पैसे खायचे होते. पण आता या सरकारने सिमेंटचे रस्ते बनवले. वाझे सारखे प्यादे जवळ ठेवायचे आणि जनतेला त्रास द्यायचा, असे त्यांची भूमिका आहे. मुंबईला पाणी न मिळायला जबाबदार उबाठा असेल, असे राम कदम म्हणाले.

शिवसेना राष्ट्रवादीवर मोठा आरोप

कोस्टल रोड ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांची होती. कोस्टल रोडच्या बाजूची मोकळी जागा उद्धव ठाकरे यांना कोणाला द्यायची आहे होती, असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला. राम कदम यांनी शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर मोठा आरोप केला. ते म्हणाले, काल सभागृहात शिवसेना नेते एकनाथ शिंदे छत्रपती संभाजी महाराज यांचा मुद्दा मांडला. त्यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, जयंत पाटील गोंधळ घालत होते, असा आरोप राम कदम यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली...
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव
रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले…
जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला?