‘संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे फोटो समोर… मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

‘संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे फोटो समोर… मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

गेले ८० दिवस आम्ही हेच तर सांगत होतो. संतोष देशमुख यांच्या फोटोचे वर्णन माझ्या भाषणात मी केलेले आहे. तेव्हा माझी टिंगल टवाळी करीत होते. हे हरामी, नालायक, जल्लाद संतोष देशमुख यांच्यावर लघुशंका करीत होते हे पाहून तुमचे हृदय कुठे हरवले होते. त्यांनी केलेल्या कृतीला राजाश्रय आहे त्यामुळे हे घडले आहे. हे फोटो त्यांची मुलं बघतील तेव्हा त्यांच्या मनाचं काय होईल असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. जर देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले तर आता धनंजय मुंडे यांचा ते आता राजीनामा घेतील..

मी मुंबईत गँगवॉर पाहत होतो. मात्र या विरोधात भूमिका घेणारे होते. मात्र वाल्मीक कराड विरोधात कोणी बोलायला तयार नाही. कारण हा बाहेर आल्यावर आपल्याला मारेल अशी दहशत समाजात आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचे फोटो आल्यानंतर प्रतिक्रीया देताना सांगितले.

महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही

वाल्मीक कराड याच्या बरेकमध्ये जाऊन त्यांची मालिश करतात काय ? एखाद्या जखमी माणसावर हे लघुशंका करतात म्हणजे यांना लाज नाही वाटत? धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सरकार घेणार नाही, म्हणून मी त्यांचा राजीनामा मागत पण नाही. पण, महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही. या सगळ्याचा सूत्रधार एकच वाल्मीक कराड आहे आणि त्याचा बाप धनंजय मुंडे आहे. आमच्या बाकी कोणाकडून अपेक्षा नाहीत, मात्र मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती, मी तर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मुलीची शपथ दिली होती असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर…

वाल्मीक कराड भलेही माझ्या जातीचा, मात्र मला विचारलं तर मी आजही म्हणेन की त्याला भर रस्त्यात फाशी द्या. पण, खुलेआम सांगतो, कोणाचा तरी गेम होणार आहे.मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर आता ११ वाजता फ्लॅश येईल धनंजय मुंडे यांचा राजीनामा..आम्ही रोज हा मुद्दा मांडणार आहोत. या आधी २-३ वर्षापूर्वी पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. वाल्मीक सांगेल तेच ते करायचे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेबाबत सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगास पुन्हा एकदा मुदतवाढ...
तिरुपतीप्रमाणे पंढरीत श्री विठ्ठलाचे टोकन दर्शन, आषाढी यात्रेपूर्वी व्यवस्थेची चाचणी होणार
क्रौर्याची परिसीमा, संतोष देशमुखांच्या मरणयातना पाहून महाराष्ट्र सुन्न! आरोपपत्रात व्हिडीओ अन् फोटोंचा समावेश
कायदा – सुव्यवस्थेचा मुडदा… महाराष्ट्रात खाकी वर्दीही सुरक्षित नाही; दरोडेखोरांचा पिंपरी – चिंचवडच्या पोलीस उपायुक्तांवर कोयत्याने हल्ला
मुद्दा – सदोष प्रश्नपत्रिकेची ‘परंपरा’ कायम
मुंडे – कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ, पहिल्याच दिवशी विरोधकांचा झंझावात, सरकार बॅकफूटवर; फडणवीस, पवार, शिंदे यांची बंद दाराआड चर्चा
लेख – अमेरिकेकडे राखीव सोन्याचा खरा साठा किती?