‘छावा’च्या समोरही अर्जुन कपूरच्या चित्रपटाचं नशीब जोरावर; करोडोंचा गल्ला
चित्रपटगृहांमध्ये अजूनही ‘छावा’ची क्रेझ कमी झालेली दिसत नाहीये. अजूनही प्रेक्षक ‘छावा’ पाहण्यासाठी आवर्जून थिएटरमध्ये जात आहेत. त्यामुळे याच दरम्यान रिलीज झालेला अर्जुन कपूरचा चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’ चा टिकाव लागेल का? हा मोठा पश्न होता. पण अखेर चित्रपटाने बाजी मारली आहे.
‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाचे कलेक्शन
लव्ह ट्रँगलची कहाणी दाखवणारा चित्रपट लोकांना नक्कीच हसवतो, मात्र चित्रपटाचे यश त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून ठरवलं जातं. ‘मेरे हसबंड की बीवी’च्याबाबतीत पण तेच झालं. निर्मात्यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.75 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 2.05 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. या चित्रपटाने भारतात दोन दिवसांत 3.80 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. यानंतर तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
चित्रपटाच्या कमाईत वाढ होणार
अर्जुन कपूरचा ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाला विकेंडचा तसा फारसा फायदा होताना दिसत नाही. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 90 लाख रुपये कमावले आहेत. तथापि, हा आकडा अंतिम नाही आणि त्यात बदल होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार तीन दिवसांत भारतात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 4.1 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. येत्या काळात चित्रपटाची कमाई वाढते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘छावा’पुढे अर्जुन कपूरच्या चित्रपटाचा टिकाव लागला
अर्जुन कपूरच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या छावा या चित्रपटाशी जोरदार टक्कर मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कथेवर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट लोकांना जास्त आवडत आहे. विकीचा हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडत आहे. अशा परिस्थितीत, मेरे पती की बीवी किती दिवस थिएटरमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवतोय ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात चित्रपटाचं कलेक्शन किती होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अर्जुन कपूरच्या ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटात लव्ह ट्रँगल प्रेमाची कहाणी दाखवण्यात आली आहे. यात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या भूमिका मुख्य असून चित्रपटाची कथा यांच्याभोवती फिरताना दिसते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List