घटस्फोटानंतर सानिया मिर्झाच्या आयुष्यात नवा आनंद, दुबईत केलीये नवी सुरुवात
Sania Mirza: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सानिया आणि शोएब यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर सानियाने घटस्फोट झाल्याचं घोषित केलं. आता सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. शिवाय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
रिपोर्टनुसार, सानिया कधीतरी भारतात येते. सानिया मुलासोबत दुबई याठिकाणी राहते. दुबईत सानियाचं स्वतःचं आलिशन घर आहे. आता सानियाने दुबईत आणखी एक घर घेतलं आहे. घटस्फोटानंतर सानियाने दुबईत एक नवी सुरुवात केली आहे. सानियाचं नवं घर आलिशान आणि भव्य असून घरातील प्रत्येक कोपर महागड्या वस्तूंनी सजवला आहे.. असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सानिया तिच्या दुबईतील नव्या घरामुळे चर्चेत आहे.
सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सानियाच्या नावाची चर्चा क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्यासोबत जोडलं जात आहे. पण यावर दोघांनी देखील कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. फक्त मोहम्मद शमीच नाही तर, दुबईतील एका मोठ्या व्यावसायिकासोबत देखील सानिया मिर्झाचे नाव जोडले जात आहे. मात्र सानियाच्या आयुष्यात नक्की कोण आहे… काही कळू शकलेलं नाही.
सानियाला कायम चाहते दुसऱ्या लग्नाबद्दल विचारत असतात. तर अनेकांनी सानिया दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सानियाच्या दुसऱ्या लग्नाच्या प्रतीक्षेत आता चाहते आहे. पण यावर सानियाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब याने तिसरं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत केलं. पण सानियाने मात्र अद्याप दुसलं केलेलं नाही. सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सानिया सोशल मीडियावर देखील स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List