अभिनेता सासूच्याच प्रेमात, बनवलं बायको, पण नंतर अनेक अडचणी, आता असं जगतायत जीवन
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक जोड्या किंवा कपल आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जास्त चर्चा झालेल्या आहेत. तर काहींनी त्यांच्यापेक्षा अगदी 4 ते 5 किंवा 10 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रींसोबत लग्न केलेल आहे. असाच एक अभिनेता आहे ज्याच्या फिल्मी करिअरपेक्षाही त्याची लव्हलाइफच जास्त चर्चेचा विषय बनली आहे. कारण या अभिनेत्याने चक्क सासूसोबतच संसार थाटला. म्हणजे या अभिनेत्याने ज्या अभिनेत्री सोबत लग्न केलं त्या अभिनेत्रीने एका सिरियलमध्ये त्याच्या सासूची भूमिका केली होती.
सासूसोबतच थाटला संसार
प्रेमाला वय, रंगरूप आणि परिस्थितीचं बंधन नसतं. प्रेम कधी, कुठे आणि कशामुळे होईल हे सांगता येत नाही. असंच काहीस या अभिनेत्या सोबतही घडलं. हे लोकप्रिय टीव्ही कपल म्हणजे इंद्रनील वर्मा आणि मेघना रामी. या जोडप्याने नुकतीच त्यांच्या 20 व्या लग्नाच्या वाढदिवसाचे शानदार सेलिब्रेशन केलं. विशेष म्हणजे, या दोघांनी एका प्रसिद्ध तेलुगू टीव्ही शो ‘चक्रवगम’ मध्ये एकत्र काम केलं आहे. या शोमध्ये मेघनाने इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती, मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते नवरा-बायको बनले.
लग्न करताना अनेकांनी टीका केली
जेव्हा इंद्रनील आणि मेघना लग्नाच्या बंधनात अडकणार होते, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. कारण टीव्ही मालिकेत मेघनाने इंद्रनीलच्या सासूची भूमिका साकारली होती आणि वास्तविक आयुष्यात ते जोडीदार बनणार होते. मात्र, प्रेमाच्या मार्गात अडथळे येतातच, पण या दोघांनी कोणत्याही टीकेची पर्वा न करता एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आजही हे जोडपं एकमेकांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
मात्र दोघांनीही मूल न ठेवण्याचा निर्णय घेतला
मात्र दोघांनीही मूल न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत सांगितलं की, “जर आम्ही आता मूल जन्माला घातलं, तर आम्ही 60 वर्षांचे झाल्यावर त्याच्या भविष्याची काळजी कोण घेणार? त्यामुळे आम्ही मूल न होण्याचा निर्णय घेतला.” असं,या कपलने सांगितलं आहे.
परंतु मेघना रामी यांच्या बाबतीत एक दुःखद घटना घडली होती. एका शूटिंगदरम्यान त्यांचा गर्भपात झाला आणि त्यामुळे त्या तब्बल ६ वर्षं डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या त्यावेळी त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या, त्यामुळे ही घटना त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. या कठीण काळात इंद्रनील वर्मा यांनी त्यांना पूर्ण साथ दिली आणि त्यांना यातून बाहेर येण्यास मदत केली.

समाजसेवेचा मार्ग स्वीकारला
संपूर्ण अनुभवातून बाहेर पडताना इंद्रनील आणि मेघनाने मिळून एक एनजीओ सुरू केला. मुलं दत्तक घेण्याचा विचारही त्यांनी केला होता, पण नंतर त्यांना जाणवलं की त्यांचं प्रेम एका मुलापुरतं मर्यादित न ठेवता, त्यांनी संपूर्ण समाजासाठी काहीतरी करायला हवं. त्यामुळे त्यांनी समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आणि गरजू लोकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
इंद्रनील आणि मेघना यांची प्रेमकहाणी एक जगावेगळं उदाहरण आहे. समाजाने त्यांच्यावर कितीही टीका केली होती तरी त्यांनी आपलं प्रेम आणि नातं टिकवून ठेवलं. आज ते फक्त एक यशस्वी जोडपं नाहीत, तर त्यांनी त्यांच्या समाजसेवेतून जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List