कान टोचले, वजन वाढवलं, घोडदौड-काठी चालवणं शिकला.. ‘छावा’साठी विकी कौशलची जबरदस्त तयारी
भूमिका कोणतीही असो, अभिनेता विकी कौशल त्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. 'छावा' या चित्रपटातून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेसाठी त्याने किती तयारी केली, याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकीने 25 किलो वजन वाढवलंय. वजनाच्या काट्याचाही फोटो त्याने पोस्ट केला आहे. तर साहसीदृश्यांसाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतलंय.
भूमिकेतील प्रत्येक बारकावे लक्षात घेऊन तो विविध कलासुद्धा शिकला. विकीने काठी चालवण्याचंही प्रशिक्षण घेतलं असून इन्स्टाग्रामवर त्याने काठी चालवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्याचसोबत तो घोडदौडसुद्धा शिकला आहे. चित्रपटाच्या सेटवर घोडदौडीचा सराव करतानाही व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. भूमिकेप्रती विकीचं समर्पण पाहून नेटकरीसुद्धा त्याचं कौतुक करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List