अतिरिक्त मैदा आरोग्यासाठी आहे धोकादायक! मैद्याला पांढरे विष का म्हणतात वाचा
On
सध्याच्या घडीला आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काही ना काही मैद्याचे पदार्थ सतत खात असतो. मैद्याच्या पदार्थांमुळे वजन तर वाढतेच शिवाय इतर अनेक आजारांशी सुद्धा सामना करावा लागतो. म्हणूनच मैद्याला “पांढरे विष” असेही म्हणतात. याचे दररोज सेवन केल्याने तुम्हाला किती प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मैद्यामध्ये कोणतेही पोषक घटक नसल्यामुळे, हे पीठ नसून याला भुसा असेच म्हटले जाते.

मैद्यामुळे आपल्या शरीरावर कोणकोणते दुष्परीणाम होतात हे पाहुया
मैद्यामुळे आपली हाडांची घनता कमी होते आणि यामुळे संधिवात आणि जळजळ सारखे आजार आपल्याला उद्भवु शकतात.
मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे जेव्हा तुम्ही यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करता तेव्हा शरीरातील साखरेची पातळी वाढते.
मैद्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या आतड्यांना चिकटून राहतात, ज्यामुळे पचनाच्या खूप समस्या निर्माण होतात.
मैद्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडीटी, पोटदुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मैद्यात फायबर अजिबात नसल्यामुळे ते पचायला खूप वेळ लागतो. पचनक्रिया मंदावण्यासोबतच चयापचय क्रियाही मंदावते.
मैद्यामुळे वजन वाढणे, डोकेदुखी अशा अनेक समस्या कायम मागे लागतात.
मैदा बनवताना अनेक प्रक्रियेच्या पातळ्यांवरून जावे लागते. शिवाय मैदा पूर्णपणे पांढरा करण्यासाठी ब्लिचिंग प्रक्रियेत अनेक रसायने वापरली जातात. या रसायनांचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
मैद्यात भरपूर प्रमाणात स्टार्च असल्यामुळे, वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक वाढते.अति प्रमाणात मैद्याचे सेवन केल्यामुळे, मधुमेह होण्याची भीती असते.
सतत मैद्याच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
(आहारात कोणतेही बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Feb 2025 20:05:29
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं...
Comment List