उन्हामुळे तुमचा चेहरा, मान टॅन झालीय का! पाच रुपयात स्किन टॅनिंगपासून होईल सुटका.. वाचा
उन्हामुळे चेहरा, मान टॅन झाल्यावर हे टॅनिंग कमी करण्यासाठी अतिशय स्वस्तातला उपाय म्हणजे लिंबू. लिंबाचा वापर टॅनिंगवर सर्वात उत्तम मानला जातो. आपल्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबर म्हणून लिंबू बेस्ट पर्याय आहे. लिंबू हे आपल्या प्रत्येकाच्या घरी असते, लिंबाचा वापर हा उन्हाळ्यात प्रामुख्याने सरबत करण्यासाठी केला जातो. पण लिंबाचा वापर केवळ सरबत करण्याइतपत मर्यादीत नाही. तर साध्या सोप्या पद्धतीने लिंबाचा वापर करुन आपण त्वचेला चकाकी देऊ शकतो. पदार्थांची लज्जत वाढविण्यासाठी लिंबाचा वापर प्रामुख्याने केला जातो.
चला तर, आपल्या स्वयंपाकघरात जा आणि चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी या सोप्या टिप्स वापरून लिंबाचे स्क्रब तयार करा.
लिंबाच्या रसामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असतात, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या टॅनिंगपासून मुक्त होऊ शकतो. याशिवाय त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी देखील असतात. त्यामुळे त्वचा टोन राहण्यास मदत होते. लिंबू त्वचेला डिटॉक्स करते.
लिंबाचा स्क्रब कसा तयार करावा?
साहित्य
3 चमचे लिंबाचा रस
1 कप साखर
3 चमचे खोबरेल तेल
कृती
3 चमचे लिंबाचा रस, त्यात आता साखर घाला.
मग हळू हळू त्यात खोबरेल तेल घाला. हे सर्व नीट मिक्स करुन घ्यावे.
मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर, हा स्क्रब चेहऱ्यावर लावावा.
किमान 15 मिनिटे हा स्क्रब तसाच ठेवून, हलक्या हाताने धुवावा.
यामुळे मृत त्वचा निघून जाते तसेच उन्हामुळे झालेले टॅनिंग पटकन निघते.
स्क्रब साफ केल्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा.
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हा स्क्रब आठवड्यातून एकदा नक्की लावावा.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List