“तू मरणार आहेस का?”; रक्ताने माखलेल्या वडिलांना पाहून तैमुरने विचारला प्रश्न

“तू मरणार आहेस का?”; रक्ताने माखलेल्या वडिलांना पाहून तैमुरने विचारला प्रश्न

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी 2025 रोजी त्याच्याच राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले. या घटनेनंतर सैफने पहिली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सैफने घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर सांगितलंय. 16 जानेवारीच्या मध्यरात्री काय घडलं, सैफने मुलांना कसं वाचवलं, त्यानंतर त्याला रिक्षामधून रुग्णालयात का नेण्यात आलं, घटनेनंतर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याने या मुलाखतीत दिली आहेत.

चाकूहल्ल्यानंतर तैमुरची प्रतिक्रिया

चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफ जखमी झाला होता. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. चोराला खोलीतच बंद करून सैफ, करीना आणि त्यांची दोन्ही मुलं इमारतीखाली उतरले. सैफला रुग्णालयात नेण्यासाठी करीना रस्त्यावर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी ओरडत होती. या घटनेविषयी सैफ म्हणाला, “करीना प्रचंड घाबरली होती. ती मदतीसाठी रस्त्यावर ओरडत होती. ती म्हणाली, तू रुग्णालयात जा आणि मी बहीण करिश्माच्या घरी जाते. ती घाबरून सर्वांना फोन करत होती, पण कोणीच जागं नव्हतं. मी ठीक आहे, मी मरणार नाही असं सांगून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तैमुरने माझ्याकडे काळजीने बघत विचारलं, तू मरणार आहेस का? मी त्याला म्हणालो, नाही.”

हल्ल्यानंतर सैफचा मोठा मुलगा इब्राहिम त्याला रुग्णालयातून घेऊन गेल्याची सुरुवातीला चर्चा होती. मात्र नंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, इब्राहिम नव्हे तर आठ वर्षांचा तैमुर सैफसोबत रुग्णालयात आला होता. इतक्या छोट्या मुलासोबत रुग्णालयात का गेलास, असा प्रश्न विचारल्यावर सैफने सांगितलं, “तो पूर्णपणे शांत होता. तो ठीक होता. तो म्हणाला, मी तुमच्यासोबत येतो. त्यावेळी असं वाटलं की जर मला काही झालं तर त्याच्या चेहऱ्याकडे फक्त बघूनच मला खूप धीर मिळेल. मला एकटं जायचं नव्हतं. तो माझ्यासाठी काय करू शकतो हे माहीत असल्यानेच माझ्या पत्नीने तैमुरला सोबत पाठवलं. कदाचित त्याक्षणी ते योग्य नव्हतं. पण मला बरं वाटलं. जरी माझं काही बरंवाईट झालं असतं, तर तो माझ्या जवळ राहावा हीच माझी इच्छा असती. त्यालासुद्धा माझी साथ सोडायची नव्हती. त्यामुळे मी, तैमुर आणि हरी आम्ही तिघं रिक्षाने रुग्णालयात गेलो.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मर्सिडीजच्या आरोपावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, नीलम गोऱ्हेंची कुंडली मांडली; म्हणाले मूर्खपणाचे… मर्सिडीजच्या आरोपावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, नीलम गोऱ्हेंची कुंडली मांडली; म्हणाले मूर्खपणाचे…
दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला, यावरून आता राजकारण...
नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळा बसेससाठी नवे धोरण लागू होणार, पाहा काय योजना
गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर, साहित्यिकांचेही टोचले कान
‘उमेदवारीसाठी सुषमा अंधारेंनी दोन कोटी घेतले’; शिवसेनेच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
‘उतेकरांनी शहाणपणा शिकवायचा नाही…’; संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘छावा’मधील ‘तो’ सीन काढून टाकण्याची मागणी
…तर ‘छावा’मधून कमावलेला पैसा सामाजिक कार्याला वाहून द्यावा; शिर्के कुटुंबीयांचे उतेकरांना आवाहन
भयंकर! ट्रकचा टायर फुटला अन् रिक्षाच्या चिंधड्या झाल्या, व्हिडीओ व्हायरल