देशातील 57,184 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर; आरोग्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती
देशातील 14 कोटींहून अधिक महिलांची स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पेंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी लोकसभेत दिली. तपासणीदरम्यान, 57,184 महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यापैकी 50,612 महिलांवर उपचार सुरू आहेत.
देशातील नऊ कोटींहून अधिक महिलांची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 96,747 महिलांना या आजाराने वेढले असून 86,196 महिलांवर उपचार सुरू आहेत, असे नड्डा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सरकारने 2018 मध्ये असंसर्जजन्य आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी एनसीडी पोर्टल सुरू केले. उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांसारखे आजार एनसीडीमध्ये समाविष्ट आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List