Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा
खासदास संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी धसांनी मोठे रान माजवले होते. आका, आकाचे आका या त्यांच्या दोन शब्दांनी राज्य गाजवले. त्यांनी वाल्मिक कराड गँगला मंत्री धनंजय मुंडे यांचे अभय असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची आणि मुंडेंची गुपचूप भेट समोर आली. त्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी फैरी झाडल्या जात आहेत. त्यात संजय राऊतांनी आज त्यांच्यावर तोफगोळाच डागला. धसांवर केलेल्या या नवीन आरोपांमुळे संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी बजावलेल्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे. आता तरी सुरेश धस मैदानात उतरून चोख प्रत्युत्तर देतील का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
सुरेश धसांवर सर्वात मोठा आरोप
डिल झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले गेले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला, असा आरोप राऊतांनी केला. मुंडे भेटीवर त्यांनी धसांचा चांगलाच समाचार घेतला. आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो. आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचा भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं, असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला.
आणि केला तो गंभीर आरोप
मला एका प्रमुख माणसाने आली सांगितलं सुरेश धस मागे घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखादा मोठा डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील. एक फार मोठं डील झाले आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाने धस यांची एकूणच कार्यपद्धतीच संशयाच्या घेऱ्यात अडकली आहे. आता धस त्याला कसं उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं?
बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे धस म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? असा चिमटा राऊत काढायला विसरले नाही. इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटणं जावो हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे.
ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याच्याने त्याने तिकडून बैठकीतून बाहेर पडले पाहिजे याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे बाहेर येऊन माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झाला आणि मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो. हिमत आहे का सांगायची? असा रोखठोक सवाल राऊतांनी धस यांना केला.
आता शिवसेना देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी
संवाद राजकारणात असला पाहिजे पण गुन्हेगाराची असावा का ज्यांच्यावर आरोप आहे ज्यांचा राजीनामा मागितला जातो कोणाच्या प्रकरणात त्यांच्याशी संवाद ठेवावा असं कोणाचं मन असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक गुन्हेगाराची राजकारणात नसावा ठेवा लागेल. हे टोलवाटोलवी करत आहेत या कोर्टातून त्या कोर्टावर टाकत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते बीडला जाणार आहोत त्यानंतर आम्ही तिकडे गेल्यावर उद्धव ठाकरे तिकडे येतील आम्ही देशमुख कुटुंबियांची जाऊन भेट घेणार आहोत. शिवसेनेला आता या विषयात लक्ष घालावे लागेल. देशमुख कुटुंबियांचे फसवणूक झाली आहे. या संदर्भात जे लढ्यात उतरले आहेत सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील. अंजली दमानिया असतील त्यांच्याशी या विषयावर बोलेन, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List