पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र यूट्युबर रणवीर अलाहबादियाचा चर्चेत असल्याचे दिसत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आई-वडिलांवर अश्लील टिप्पणी केल्या प्रकरणी रणवीर विरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आल्या. त्यानंतर रणवीरने उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सोशल मीडियावर रणवीरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रणवीरची चांगलीच फिरकी घेताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा २०२४मधील आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार त्याचा सिनेमा ‘बडे मिया छोटे मियाचे’ प्रमोशन करण्यासाठी रणवीरच्या शोमध्ये पोहोचला आहे. त्यावेळी अक्षयसोबत अभिनेता
टायगर श्रॉफ देखील असल्याचे दिसत आहे. रणवीर अक्षय आणि टायगरसोबत गप्पा मारत असतो. दरम्यान, रणवीरने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देत अक्षयने चांगलीच फिरकी घेतली आहे. अक्षयने रणवीरला त्याच्या शोमधून जाऊन ट्रोल केल्याने चाहत्यांना आनंद झाला होता. आता हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“kabhi kisi ko pela hai aapne”
pic.twitter.com/zywWhuNu4R
— sohom (@AwaaraHoon) April 6, 2024
अक्षय नेमकं काय म्हणाला?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणवीर अक्षय कुमारला विचारत आहे की, ‘कभी किसी को पेला है आपने?’ रणवीरच्या या प्रश्नावर उत्तर न देता अक्षयने त्याला ट्रोल केले आहे. अक्षय रणवीरला म्हणाला, ‘पेला है मतलब क्या होता है? दो मतलब होते है पेलने के बेटा.’ सध्या सोशल मीडियावर अक्षय आणि रणवीरचा हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.
रणवीरची उच्च न्यायालयात धाव
वेगवेगळ्या राज्यात रणवीर अलाहबादिया विरोधात FIR दाखल करण्यात आले. हे खटले रद्द करण्यासाठी रणवीरने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोवाठवला. पण उच्च न्यायालयात देखील त्याच्या पदरी निराशी आली. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायाधीशांनी रणवीरला चांगलेच फटकराले आहे. रणवीर अलाहबादिया विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी केवळ रणवीरच्या शोवर बंदी घातली नसून त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय रणवीरला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List