30 हजारांत अमर होण्याचे किट, अमेरिकन अब्जाधीश देतोय चिरतरुण राहण्याचा मंत्र
वाढतं वय किंवा मृत्यूला कुणी टाळू शकत नाही. अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉनसन यांनी मात्र वाढत्या वयाला आणि मृत्यूला आव्हान द्यायचं ठरवलंय. त्यासाठी ब्रायन जॉनसन आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करताहेत. आपली बेसुमार संपत्ती केवळ याचसाठी खर्च करत आहेत.
अमर होण्याचा मंत्र सांगणार्या ब्रायन जॉनसनने आपला अनुभव दुसर्यांसोबत शेअर करण्यासाठी आणि त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभावे, म्हणून ब्रायन जॉनसनने एक परिषद घेतली. त्याचे नाव ‘डोंट डाय समिट’ असे ठेवले. वाढत्या वयाला कसे रोखायचे, याबाबतची माहिती त्यांनी समिटमध्ये दिली. त्यासाठी त्याने ३४९ डॉलर म्हणजे ३०३४२ रुपये एवढे तिकीट ठेवले. यावेळी खास जेवण ठेवण्यात आले. जेवणामध्ये एडोबो स्टीक, कीनोवा आणि भाज्यांचा समावेश होता. वेगवेगळ्या पावडरचे मिश्रणही टाकले. एवढेच नव्हे स्नेक ऑईल सारख्या वेगवेगळ्या तेलांचाही समावेश करण्यात आला होता. सहभागी लोकांची रक्ततपासणीही करण्यात आली.
ब्रायन जॉनसन दरवर्षी १ कोटी ७४ लाख रुपये याच कामासाठी खर्च करतात. त्यांचा दिनक्रम शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेचार वाजता उठून फक्त पुढील चार तासांत दिवसभराचे भोजन करतात. सकाळी ९ वाजता ब्रायनचे दिवसभराचे शेवटचे खाणे असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List