लोक भक्त असतात, लोक मतं ‘बनतात’; अभिनेता अतुल कुलकर्णीची ‘लोक मताची डुबकी’ कविता चर्चेत
अभिनेता अतुल कुलकर्णी यांची ओळख एक चतुरस्त्र कलाकार म्हणून सर्वज्ञात आहे. अतुल कुलकर्णी अभिनयासोबत त्याच्या कवितांसाठी सुद्धा सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. नुकतीच त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर ‘लोक मताची डुबकी’ या मथळ्याखाली एक कविता पोस्ट केली आहे. कविता ही अतिशय बोलकी असून, सद्यस्थितीच्या घडामोडींवर ही कविता उत्तम प्रकाश पाडणारी आहे. ‘नटरंग’ चित्रपटातील अतुल कुलकर्णी यांनी केलेली भूमिका ही आजही सर्वांच्या स्मरणात आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी त्यांची ओळख प्रेक्षकांना आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी सध्या ते मराठी चित्रपटांमध्ये काम का करत नाही याबद्दल परखडपणे बोलले होते. सध्याच्या घडीला त्यांनी एक्सवर टाकलेल्या कवितेमुळे अतुल कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत.
मतं गर्दी करतात मतं डुबकी घेतात. लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात. लोक रडतात भेकतात अशा आशयाची ही कविता त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. अतुल कुलकर्णीने कायम समाजातील विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतो. सध्याच्या घडीला त्याने केलेली कविता अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
— atul kulkarni (@atul_kulkarni) February 17, 2025
अतुल कुलकर्णी हा कायम विविध विषयांवर आपली मतं व्यक्त करताना दिसतो. अतुल कुलकर्णीने पोस्ट केलेल्या एक्सवरील कवितेला आत्तापर्यंत 20 हजारांपेक्षा लाईक मिळाल्या आहेत. केवळ लाईक्स नाहीत तर कुलकर्णीच्या या कवितेवर प्रतिक्रियांचाही वर्षाव होताना दिसत आहे. अतिशय बोलकी अशी ही कविता सर्वसामान्यांच्या काळजाला भिडणारी असल्यामुळेच या कवितेला भरभरून प्रतिसाद समाजमाध्यमांवर मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी अतुल कुलकर्णीने ‘वेडी आशा’ या कवितेच्या माध्यमातून मतदार म्हणून आपण कुठे चुकतो हे मांडलं होतं. अतुल कुलकर्णी हा कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे सध्याच्या घडामोडींवर कवितेच्या माध्यमातून त्याने सद्यस्थितीवर परखड भाष्य केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List