जजच्या खुर्चीवर बसून मलायका कमावते कोट्यवधींचा माया, वयाच्या 51 व्या इतक्या कोटींची मालकीण
Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक पक्क स्थान निर्माण केलंय. मलायका आता सिनेमांपासून दूर असली तरी रियालिटी शोच्या माध्यमातून गडगंज पैसा कमवते. एवढंच नाही तर रियालिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री कोट्यवधी रुपये मानधन घेते. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर अभिनेत्री रॉयल आयुष्य जगतेय.
रियालिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारण्यासाठी मलायकाचं मानधन देखील तगडं आहे .मलायकाच्या मानधनाचा आकडा ऐकला तर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. रिपोर्टनुसार एका एपिसोड साठी मला एका सहा ते आठ लाख रुपये चार्ज करते. एवढेच नाही तर अभिनेत्री अनेक ब्रँडचं शूट करते आणि प्रमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर टाकते. त्यासाठी देखील अभिनेत्री गडगंज पैसा घेते.
मलायका अधिक कमाई योगा स्टुडिओमधून करते. या व्यतिरिक्त, तिला अनेक ब्रँड्सचं प्रमोशन करून अभिनेत्री कोट्यवधी रुपये कमवते. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत तिच्या नेट वर्थ लक्षणीय वाढ झाली आहे. सोशल मीडियावर वर्कआउटच्या टिप्स अभिनेत्री चाहत्यांना देत असते. वयाच्या पन्नाशीत देखील मलायका चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आज मलायकाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. शिवाय मलायकाच्या गॅरेजमध्ये देखील महागड्या गाड्या आहेत.
सिनेमा आयटम सॉंग करण्यासाठी मलायका दीड कोटी रुपये फी घेते . मलायकाच्या नेटवर्क बद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री 100 कोटी रुपयांची मालकीण आहे. मुंबई मलायका आलिशान घरात राहते. अभिनेत्री स्वतःच्या घराचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List