ट्रिपल एक्सेल ड्रेस निवडताना या गोष्टींचा नक्की विचार करा! तुम्हीही दिसाल मस्त स्लिम
लठ्ठ स्त्रियांनी लठ्ठपणा लपवण्यासाठी कपड्यांच्या फिटिंगची विशेष काळजी घ्यावी. खूप घट्ट कपडे आणि खूप सैल कपडे दोन्ही तुमच्यासाठी वाईट आहेत. सैल कपड्यांमध्ये तुमचे शरीर खूप जाड दिसेल. कपडे घालताना नेहमी मोठ्या प्रिंट टाळा. मोठा प्रिंट घातल्याने अधिक लठ्ठ दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही ड्रेस निवडताना छोटी प्रिंट असलेले ड्रेस कायम निवडावे. तुम्ही जीन्स घातली असेल तर लाँग टॉप घाला.
वजन जास्त असल्यावर महिलांना खासकरून प्रश्न पडतो की, ड्रेसची निवड कशी करावी. अशावेळी आपण ज्यामध्ये किमान थोडे बारीक दिसू असेच ड्रेस निवडायला हवेत.
तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला लठ्ठ दिसू नये असे वाटत आहे. तर याकरता काही महत्त्वपूर्ण टिप्स आम्ही घेऊन आलोय. या टीप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा लठ्ठपणा सहज लपवू शकता.
शरीराची जाडी अनेकदा आपल्यावर बंधने आणते. खासकरून अशावेळी फॅशन करतानाही खूप लिमिटेड पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळेच प्रत्येक ड्रेस आपल्याला शोभून दिसत नाही.
अनेकदा वजन जास्त असलेल्या महिलांना कसे ड्रेस घालावेत याची माहिती नसते. त्यामुळे फजिती उडते. शरीराच्या आकारानुसार कपडे कसे घालावे हे माहित नसते.
तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक आणि तुमच्या शरीराची रचना लक्षात घेऊन कपडे घालावेत.
कपड्यांचा रंग तुमच्या शरीराच्या आकारावर खूप महत्त्वाचा परिणाम करतो.
तुम्हाला तुमचे वाढलेले वजन खरोखर लपवायचे असेल तर तुम्ही गडद आणि उठावदार रंग घालावेत. अशा परिस्थितीत तुम्ही काळे, जांभळे, लाल रंग, शाही निळे, गडद राखाडी रंगाचे कपडे घालू शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List