आई, गर्लफ्रेंडसह सहा जणांची हत्या करून पोलीस स्टेशनमध्ये आला, पोलिसांना दिली धक्कादायक माहिती
केरळमधील थिरुवअनंतरपुरम येथे एका 23 वर्षीय तरुणाने त्याची आई व गर्लफ्रेंडसह कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अफान असे त्या तरुणाचे नाव असून सोमवारी पोलीस ठाण्यात येऊन त्याने स्वत: या हत्यांची कबुली दिली. मात्र पोलिसांसमोर गुन्हा कबूल करत असतानाच आपण देखील विष प्यायल्याचे त्याने पोलिसांना सांगितले त्यामुळे पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
अफान याने त्याची आई बिमा, गर्लफ्रेंड फरझाना, 13 वर्षाचा भाऊ अहसान, आझी सलमा देवी, काका लतिफ, काकी साहिबा यांची सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हत्या केली. दरम्यान बिमा यांना आजुबाजुच्या लोकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हत्या केल्यानंतर अफान पोलीस ठाण्यात आला व त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.
अफानने पोलीस ठाण्यात त्याचा गुन्हा कबूल केला. मात्र त्याने विष प्यायल्याचे देखील सांगितले त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. अद्याप त्याने या सगळ्यांच्या हत्या का केल्या त्याचे कारण समोर आलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List