रणवीर अलाहबादियाचं वादग्रस्त वक्तव्य, YouTube चा मोठा निर्णय, 3 दिवसांचा अल्टिमेटम
बीअर बायसेप्स नावाने प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया नुकताच समय रैना याच्या कॉमेडी रिअॅलिटी शो इंजियाज गॉट लेटेंटमध्ये पोहोचला होता. येथे रणवीर याने स्पर्धकाला आपत्तीजनक प्रश्न विचारला. ज्यामुळे युट्यूबर आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रकरण इतकं टोकाला गेलं आहे की, रणवीर याच्याविरोधत एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. सर्वच स्तरातून विरोध होत असल्याचं लक्षात येताच रणवीर याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी देखील मागितली. पण आता याप्रकरणी युट्यूबने मोठं निर्णय घेतला आहे. युट्यूबने तो वादग्रस्त व्हिडीओ YouTube वरुन हटवला आहे.
व्हिडीओवर NHRC ने देखील आक्षेप घेतला आहे. NHRC ने यूट्यूबला पत्र लिहून, प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त व्हिडीओ हटवण्यास सांगितलं. शिवाय तीन दिवसांमध्ये प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. यासोबतच गुवाहाटी पोलिसांनी या प्रकरणी एफआयआरही नोंदवला आहे. NHRC सदस्य प्रियांक कानूनगो यांनी शोमध्ये सहभागी कंटेंट निर्मात्यांना प्राणी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर, कानूनगो यांनी सामिल युट्यूबर यांना अटक करून मानसिक उपचार द्यावेत… असा सल्ला पोलिसांना दिला आहे. त्या पुढे म्हणाल्या, ‘माणूस आणि प्राणी यांच्यातील फरक म्हणजे विवेक आणि बुद्धी आणि माणसाची विवेकबुद्धी त्याला सभ्यतेकडे आणते. पण जो व्यक्ती आई-वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असेल तर, ती व्यक्त प्राणी आहे…’
‘सर्वात मोठं दुर्भाग्य म्हणजे त्या व्यक्तीच्या आई – वडिलांचं, ज्यांच्या मुलगा सर्वाजनिक प्लॅटफॉर्मवर असं वक्तव्य करत आहे. तो विकृत मानसिकतेने त्रस्त आहे. “खरं तर त्याला उपचाराची गरज आहे.’ असं देखील प्रियांक कानूनगो म्हणाले
प्रियांक कानूनगो पुढे म्हणाले, ‘आम्ही युट्यूबला सांगितलं आहे की, असे कटेंट भारतात चालणार नाहीत. असे कटेंट तात्काळ हटवा आणि ज्याने केलं आहे. त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करा.. .आम्ही नोटीस बजावली आहे, यावर कारवाई करण्याची जबाबदारी यूट्यूबची आहे, जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही यूट्यूबवर कारवाई करू.’ असा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे.
रणवीर अलाहबादियाने मागितली माफी…
सर्वत्र संतापाची लाट असल्यामुळे समय रैनाच्या शोमध्ये अश्लील प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागितली आहे. ‘माझी टिप्पणी केवळ अयोग्यच नव्हती, तर मजेदारही नव्हती. कॉमेडी हा माझा पिंड नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे.’ असं म्हणत रणवीर याने माफी मागितली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List