‘अत्यंत खतरनाक ट्रान्सफॉर्मेशन’; अक्षय खन्नाचा लूक पहिला आणि विकी कौशल घाबरला
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्याने घेतलेली मेहनत, त्याचा अभिनय या सर्वांसाठी त्याचं कौतुक होताना दिसत आहे. त्याच्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटातील विक्की कौशलचा लूक आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन लोकांच्या मनाला भावत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने विकी अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. त्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकसाठी किंवा त्यांच्या दिसण्याच्या जवळपास जाण्यासाठी त्याला काय काय तयार करावी लागली किंवा त्याच्याकडून काय तयारी करून घेतली याबाबत त्याने बऱ्याचदा सांगितलं आहे.
विकीच्या लूकसाठी लक्ष्मण उतेकर फारच कॉन्शिअस आणि स्ट्रिक्ट होते.
विक्कीनं सांगितलं की, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकबाबत फारच कॉन्शिअस आणि स्ट्रिक्ट होते. एकवेळ अशी होती की, त्यांनी चित्रपटाचं शुटिंग सुरू करण्यास थेट नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की, जोपर्यंत विक्कीचा अपीयरेंस एखाद्या खऱ्या योद्ध्यासारखा होत नाही, तोपर्यंत ते शुटिंग सुरू करणार नाहीत.
एका मुलाखतीत विकीने हा किस्सा तो प्रसंग सांगितला की,”विकीनं सांगितलं की, “‘छावा’ हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये साकारलेलं पात्र सर्वात कठीण होतं, कारण एकाच वेळी 25 किलो वजन वाढवणं सोपं नसतं. ते माझ्यासाठी खूप कठीण होतं. हे वजन वाढवण्यासाठी मला 7 महिने लागले. लक्ष्मण सरांनी स्पष्टपणे सांगितलेलं की, जोपर्यंत तुझा लूक एखाद्या योद्ध्यासारखा होत नाही, तू घोडेस्वारी शिकत नाही, तलवारबाजीचे पूर्ण प्रशिक्षण घेत नाही आणि अॅक्टिंग फायटिंग शिकत नाही, तोपर्यंत मी चित्रपट सुरू करणार नाही. त्यावेळी ते मला म्हणाले की, ‘मी माझ्या प्रेक्षकांना फसवणार नाही. मी व्हिएफएक्सचा वापर करणार नाही.”
लूकबाबत विकीकडून प्रचंड मेहनत करून घेतली
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी लूकबाबत विकीकडून प्रचंड मेहनत करून घेतली आहे. विकीने पुढे बोलताना सांगितलं की,”मला माझे केस आणि दाढी वाढवायची होती आणि पिळदार शरीरही बनवायचं होतं. सिनेमाची शुटिंग सुरू होण्यापूर्वी यामध्येच फार वेळ गेला. जर तुम्ही सेटवर 2000 लोकांना पाहिलं, तर वास्तवात सेटवर 2000 लोकच होते. आमच्याकडे 2000 ज्युनिअर आर्टिस्ट आणि देशातील 500 सर्वोत्तम स्टंटमॅन होते. त्यांनी अत्यंत ग्राऊंड लेव्हलवर आणि गंभीररित्या शूट केलं आहे.” लक्ष्मण उतेकर यांनी फक्त विकीचं नाही तर इतर गोष्टींकडेही तेवढ्याच बारकाईने लक्ष दिल्याचं त्यानं सांगितलं.
अक्षय खन्नाच्या ट्रान्सफॉर्मेशनची विकीपेक्षाही जास्त चर्चा
हे झालं विकीबद्दल पण विकीने स्वत:बद्दल सांगताना उल्लेख केला ते अक्षय खन्नाचा. विकीची तयारी तर लक्ष्मण उतेकरांनी करून घेतलीच होती पण मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाच्या ट्रान्सफॉर्मेशनची त्याही पेक्षा जास्त चर्चा होतेय. विकीने स्वत:चा किस्सा सांगितला आहे. की अक्षय खन्नाचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तो घाबरला होता अस त्याने सांगितलं.
अक्षयचा अभिनय पाहून सर्वच हैराण झाले
‘छावा’मध्ये मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी अत्यंत खतरनाक ट्रान्सफॉर्मेशन केलंय, त्याबाबत बोलताना विकी कौशल म्हणाला, “मला त्यांच्या लूक्सचे फोटो दाखवण्यात आले आणि मी पुरता हैराण झालो. मला विश्वासच बसत नव्हता. जेव्हा मी अॅक्चुअलमध्ये सेटवर त्यांचा लूक पाहिला, त्यावेळी त्यांचं वागणं,हावभाव सर्वकाही विश्वास करण्यापलिकडचं होतं. मी हैराण होतो. त्यांनी खरोखरंच भूमिकेला जिवंत केलं. त्यांची क्रूरता एवढ्या योग्य पद्धतीनं अभिनयातून व्यक्त झाली आहे की, सारेच हैराण झाले.” विकीने अक्षय खन्नाच्या ट्रान्सफॉर्मेशनपासून त्याच्या अभिनयाचीही तेवढंच कौतुक केलं आहे.
‘छावा’मध्ये विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आणि अक्षय खन्ना मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List