उन्हाळ्यात द्राक्षांपासून बनवा असा साधा सोपा फेसपॅक.. वाचा 

उन्हाळ्यात द्राक्षांपासून बनवा असा साधा सोपा फेसपॅक.. वाचा 

उन्हामुळे त्वचा काळवंडते, अशावेळी नेमका उपाय काय करायचा असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये प्रदूषण,  धूळ, माती, घाण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचे खूप नुकसान होते. चेहरा थंड ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, यावर उत्तर आहे द्राक्षे. उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी द्राक्षे हा उत्तम पर्याय आहे. द्राक्षांपासून नानाविध फेसपॅक बनवून उन्हाळ्यामध्ये आपण चेहरा सुंदर ठेवू शकतो. 
द्राक्षे आणि पुदीना फेस पॅक
द्राक्षे बारीक करून त्यात पुदिन्याची पाने मिसळा. तुम्हाला हवे असल्यास त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता. हे तिन्ही चांगले मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यानंतर बर्फाचा तुकडा गुलाब पाण्यात बुडवून संपूर्ण चेहऱ्यावर चोळा. हा पॅक केवळ चेहऱ्यावरच चमक आणणार नाही तर तुमची त्वचा तेलकट असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

द्राक्षे आणि गाजर फेस पॅक

द्राक्षे बारीक करा म्हणजे त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा क्रीम घाला. तसेच एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा गाजराचा रस एकत्र करा. हे सर्व चांगले मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावून सोडा. ते सुकल्यावर कोमट पाण्याने धुवावे. हा मास्क वापरल्याने त्वचा घट्ट होते आणि चमकही येते.

तेलकट त्वचेसाठी द्राक्षांचा फेस पॅक

एका लहान भांड्यात मुलतानी माती घ्या. त्यात काही थेंब लिंबाचा रस आणि काही थेंब गुलाबपाणी घाला. यानंतर त्यात द्राक्षाची पेस्ट चांगली मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तसाच राहू द्या. ते सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे....
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर
मोठी बातमी! घोषणा देत तरुणाची मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी
‘त्यांचा घटस्फोट…’, मामा गोविंदाच्या डिव्होर्सवर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया
नागीन 7 : या पाच नायिका एकता कपूर यांच्या नव्या “नागीन” च्या शर्यतीत
37 वर्षांनी गोविंदा आणि सुनीताचा होणार ‘ग्रे डिव्होर्स?’ नक्की काय आहे संकल्पना वाचा
“देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही, दिशाभूल का करता?”; त्र्यंबकेश्वर येथे नृत्य करण्यास मनाई करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर