तलासरीवासीयांवर अस्मानी संकट; मदतीची फुटकी कवडीही नाही, 240 घरांचे नुकसान होऊन नऊ महिने उलटले

तलासरीवासीयांवर अस्मानी संकट; मदतीची फुटकी कवडीही नाही, 240 घरांचे नुकसान होऊन नऊ महिने उलटले

मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तलासरीवासीयांना बसला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 240 घरांचे नुकसान झाले. अस्मानी संकटात भरडल्या गेलेल्या नागरिकांना नऊ महिने उलटले तरी मदतीची फुटकी कवडीही मिळाली नाही. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मात्र असे असताना सरकार राजकारणात बिझी असल्याने नैसर्गिक आपत्तीत बेघर झालेले नागरिक वाऱ्यावर आहेत.

तलासरी तालुक्यात मे 2024 ला 240 घरांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून बेघर झालेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या आपत्तीनंतर प्रशासनाकडून पंचनामे तर करण्यात आले. मात्र नऊ महिने उलटले तरी नुकसानभरपाई मिळलेली नाही. मे 2024 रोजी कोचाई गावातील वडीपाडा, पाटीलपाडा, गुरोडपाडा, उबरपाडा, बडघापाडा, जुनेवारपाडा, उधवा येथील मिसाळपाडा, ठाकरपाडा, राबडपाडा, दळवीपाडा, वाणीपाडा, कासपाडा, गावठाणपाडा, सुरतीपाडा, केवडीपाडा, बाबनपाडा या गाव पाड्यांतील शेकडो घरांचे नुकसान झाले होते. वाड्यापाड्यातील गोठे, पोल्ट्री फार्मचे लाखोंचे नुकसान झाले. तसेच वीटभट्ट्यांचा चिखल झाला असून भाताच्या पेंढ्याही भिजल्या. यात दोन बैलांचा मृत्यू झाला.

लोकसभेपाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याचे कारण देत तहसीलदारांनी वेळ मारून नेली. लोकसभा, विधानसभेचा निकालही लागला, सरकार स्थापन झाले तरी नुकसानभरपाईचा पत्ताच नाही. आम्हाला भरपाई कधी मिळणार, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

उधवा येथे मृत्युमुखी पडलेल्या बैलांची नुकानभरपाई आली असून ती संबंधित शेतकऱ्यांना वाटप केली आहे. इतर नुकसानभरपाई अजून प्राप्त झालेली नाही. आल्यावर तातडीने वाटप करण्यात येईल.
अमोल पाठक, तहसीलदार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा
लाडक्या बहि‍णींनी राज्य सरकारला मालामाल केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या तिजोरीवर ताण आला. भावाच्या खिशावर ताण आल्याचे लक्षात येताच बहिणीचा जीव...
‘छावा’ची स्क्रीप्ट ऐकताच विकी कौशल भावूक झाला, हात जोडून म्हणाला…; लेखकाचा मोठा खुलासा
‘छावा’ पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मनाला भिडणारी पोस्ट; ‘हाथी घोडे, तोफ तलवारे..’
रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात अखंड बुडाले होते; ते प्रपोज करणार तेवढ्यात लाईट गेली अन् सगळंच फिसकटलं,काय आहे तो किस्सा
नवरा म्हणाला, तुझे ड्रायव्हरसोबत संबंध म्हणून…, मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली अभिनेत्रीची साथ
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाविरोधात पुरातत्त्व विभागाचा इशारा
१४ तास बेशुद्ध, बीपी लो… बिग बींना केले होते मृत घोषित, वाचा नेमकं काय झालं होतं?