निस्तेज केसांसाठी महिन्यातून एकदा या हेअर पॅकचा वापर करा, केस होतील मजबूत आणि घनदाट
वातावरणात बदल झाला की, आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. यामध्ये खासकरून केसांची निगा राखणे हे गरजेचे असते. प्रदुषणामुळे केस खूपच कोरडे होऊ लागतात. केसांमध्ये कोंड्याची समस्या ही प्रदुषणामुळे वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना हानिकारक ठरतात. परंतु मेंदी मात्र केसांसाठी कायमच गुणकारी ठरलेली आहे.
मेंदीचा सर्वात लोकप्रिय वापर नैसर्गिक केसांचा रंग म्हणून आहे. तथापि पांढरे केस रंगवण्याव्यतिरिक्त मेंदीचे केसांसाठी इतर अनेक फायदे आहेत.
मेहंदी आपल्याला कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. अलीकडे बहुतेकजण कोंड्यामुळे त्रस्त आहेत. डोक्यातील कोंडा ही एक जुनी समस्या आहे.
डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून केवळ एकच नाव ते आहे मेहंदी. मेंदीने तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.
नारळाचे तेल, लिंबाचा रस आणि मेंदीचा हेअर पॅक –
एका वाडग्यात चार चमचे मेंदी पावडर घ्या आणि त्यात थोडे खोबरेल तेल घाला. तसेच एक चमचा ताज्या लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य एकत्र करा. हा हेअर पॅक केसांवर लावा. 30-45 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. त्यानंतर कंडिशनर देखील लावा. हा मेंदीचा हेअर पॅक आठवड्यातून एकदा वापरल्यास उत्तम.
मेंदीमुळे केसांना योग्य ते पोषण मिळते. तसेच मेंदीमुळे केसांना कुठलीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा मेंदी वापरणे हे हितावह आहे.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List