मी आतापर्यंत 38 महिलांना…, वयाच्या 59 व्या वर्षी गायकाची टीव्ही होस्टकडे अशी मागणी
प्रसिद्ध पाकिस्तानी संगीतकार आणि गायक चाहत फतेह अली खान यांनी एका शोमध्ये टीव्ही होस्टलाच लग्नासाठी मागणी घातली आहे. सांगायचं झालं तर, चाहत फतेह अली खान त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, वादग्रस्त कारणामुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी महिलेने गायकावर गंभी आरोप केले होते. चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोप महिलेने केले होते. आता गायकाने वयाच्या 59 व्या टीव्ही होस्ट महिलेला लग्नाची मागणी घातली आहे.
सांगायचं झालं तर, चाहत फतेह अली खान एका शोमध्ये पोहोचले होते. शोमध्ये त्यांनी महिलेला लग्नासाठी मागणी घातली आहे. शोची होस्ट नियाजी हिने चाहत फतेह अली खान यांनी विचारलं, ‘तुम्हाला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे?’ यावर गायक म्हणाले, ‘अगदी तुझ्यासारखी…’
चाहत फतेह अली खान म्हणाले, ‘मला तुझ्यासारख्या मुलीलीसोबत लग्न करायला आवडेल. मी गेल्या वर्षापासून तुझ्या मागावर आहे.’ पण होस्ट गायकाला नकार देत म्हणाली, ‘मी असं करू शकत नाही. कारण माझं कुटुंब स्ट्रिक्ट आहे आणि निवड वेगळी आहे…’
होस्टने नकार दिल्यानंतर देखील चाहत फतेह अली खान सतत होस्टचं कौतुक करत राहिले आणि प्रपोज करत राहिले. एवढंच नाही तर, चाहत फतेह अली खान यांनी दावा केला आहे की, आतापर्यंत मी 38 मुलींना लग्नासाठी विचारलं आहे. अशात गायकाला विचारण्यात आलं. ‘एवढ्या मुलींनी तुम्हाला नकार दिला.’ यावर चाहत फतेह अली खान म्हणाले, ‘प्रत्येकाच्या हृदयाची स्वतःची इच्छा असते…’ सध्या सर्वत्र चाहत फतेह अली खान यांची चर्चा रंगली आहे.
चाहत फतेह अली खान कायम त्यांच्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असतात. शिवाय सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अनेकांना त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहे. चाहत फतेही अली खान यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. त्यांच्या आनेक गाण्यांना चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतल आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List