मिंध्यांनी डावलले जाण्याची सवय करून घ्यावी, अंबादास दानवे यांचा टोला
मंगळवारी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले हजर नव्हते. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीसांनी अजित पवारांना घेतले मात्र एकनाथ शिंदे यांना डावलले. तसेच एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या काही योजना देखील फडणवीस यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला टोला लगावला आहे.
१. आपत्ती व्यवस्थापन समिती – शिंदे गट बाद..
२. उद्योग विभागाचे निर्णय – शिंदे गट बाद..
३. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक – शिंदे गट बादसुरुवात झाली आहे.. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे!…
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 11, 2025
अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ”1. आपत्ती व्यवस्थापन समिती – शिंदे गट बाद. 2. उद्योग विभागाचे निर्णय – शिंदे गट बाद. 3. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठक – शिंदे गट बाद. सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी. तुमच्या योजनांवर फुल्या मारण्याचा सिलसीलाही सुरू झाला आहे, असे अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List