Photo Gallery- ‘स्मार्ट सिटी’ पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाची दुरावस्था, सर्व ठिकाणी फक्त धुळीचे आणि घाणीचे साम्राज्य..
On
पाण्याचा थेंबही नसलेली पाणपोई, आसनव्यवस्थेच्या निखळलेल्या फरशा, राडारोडा आणि कचऱ्याच्या ढिगांनी माखलेलं आवार, फुटलेलं ड्रेनेज, तुटलेल्या होर्डिंगचा सांगाडा, अन् पाहावे तिकडे अस्वच्छताच अस्वच्छता ! ही दैना आहे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाची. शहराचं नाक असलेल्या या स्थानकात रोज हजारो प्रवाशांची ये-जा असते; पण ती नाक धरूनच ! आवारात बिनदिक्कतपणे घुसखोरी करणाऱ्या रिक्षाचालकांचा प्रवाशांना सोसावा लागणारा उद्दामपणा न्याराच ! ही स्थिती बदलून आम्हाला सोयीसुविधा मिळणार का? असा सवाल आता प्रवासी करत आहेत. (फोटो- चंद्रकांत पालकर)




Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Feb 2025 02:03:53
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे...
Comment List