‘गोपीनाथजी यांचे चाहते एकत्र येत असतील तर वेगळा पक्ष…,’ मंत्री पंकजा मुंडे यांचे वक्तव्याने खळबळ
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरुन राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘ जर माझे वडील गोपीनाथजी यांचे चाहते एकत्र येत असतील तर मी नवीन पक्ष बनवू शकते अशा आशयाचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमात केल्यानंतर राजकारणात एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. रविवारी नाशिक येथील स्वामी समर्थ केंद्राच्या एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की माझ्या वडीलांच्या समर्थकांकडे एवढी प्रभावी संख्या आणि ताकद आहे की मी वेगळा पक्ष देखील स्थापन करू शकते. या टीप्पणी नंतर राजकारणात खळबळ उडणे स्वाभाविक आहे.
पंकजा मुंडे यांनी केलेले हे वक्तव्य त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी केले होते की भाजपाला अप्रत्यक्षपणे इशारा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याने नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
लोक केवळ गोपीनाथजी यांची मुलगी म्हणून माझ्या सोबत नाहीत….
नाशिक येथील या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे देखील स्पष्ट केले की गोपीनाथ मुंडे यांचे चाहते त्यांचा वारसा आणि त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. त्या पुढे म्हणाल्या की , ‘ते केवळ गोपीनाथ यांची मुलगी म्हणून माझ्या सोबत जोडलेले नाहीत तर माझ्या पित्याचे गुण आणि त्यांच्या प्रेमामुळे जोडलेले आहेत.’
गोपीनाथ मुंडे याच्या चाहत्यांची एक पार्टी आहे
पंकजा मुंडे यांचे हे व्यक्तव्य त्या आपल्या वडीलांच्या राजकीय वारसा किती गंभीरतेने घेतात याचे निदर्शक आहे. आणि त्यांचे समर्थक एकत्र येऊन मोठी राजकीय ताकद बनू शकतो. त्या म्हणाल्या की गोपीनाथजींच्या चाहत्यांची एक पार्टी आहे.गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाच्या जन्मापासून काम केले आहे, आणि राज्यात या पार्टीची स्थापना झाली आहे.
पंकजा मुंडे वक्तव्यावर कोणाचीही प्रतिक्रिया नाही!
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची सत्यता आणि या मागचा त्यांचा उद्देश्य यावर मात्र भाजपाच्या कोणत्याही नेत्याने टीप्पणी केलेली नाही. भाजपाच्यावतीने कोणाचीही औपचारिक प्रतिक्रीया देखील आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच रहस्यमय झालेले आहे.आता याची उत्सुकता असेल की पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कोणत्या दिशेला वळणार ? की हे केवळ एक वक्तव्य आहे की यामागे काही राजकीय चाल आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List