मोबाईलवर मुलाचा तो मेसेज पाहिला अन् तानाजी सावंत प्रचंड घाबरले, ऋषीराज यांच्या बेपत्ता प्रकरणात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी समोर येत आहे. , माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.
साधारणपणे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवर ऋषीराज यांनी एक मेसेज पाठवला तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय उड्डाणमंत्री मंत्र्यांशी संपर्क साधला. त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हे विशाखापट्टणमला आहेत, ते आता पुण्याकडे निघाले आहेत. तानाजी सावंत हे स्वत: पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले असून, ते सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान या सर्व प्रकरणावर तानाजी सावंत यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. तो अचानक एअरपोर्टला गेला, यामुळे मी कॅाशियस झालो. तो बाहेर जाताना नेहमी सांगुन जातो. पहील्यांदाच असे झाले त्यानं काहीच सांगितले नाही, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List