सुरेश धसांनी अचानक युटर्न का घेतला? बावनकुळेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं? अजंली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

सुरेश धसांनी अचानक युटर्न का घेतला? बावनकुळेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं? अजंली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेला दोन महिने झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात सुरूवातीपासूनच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया यांच्यासोबतच भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील चांगलेच आक्रमक आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मात्र आता अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावरच आरोप केले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया? 

‘सुरेश धस यांची जी भूमिका आहे ती अचानक कशी काय बदलली हा माझा त्यांना प्रश्न आहे अचानक ते युटर्न घेताना पाहायला मिळतात अशा पद्धतीने सुरेश धसांनी विधान करणे हे संकेतांना धरून नाहीये , मला तर माझ्या खात्रीलायक सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. त्यांना त्यांची भूमिका बदलायला किंवा सौम्य करण्यास सांगण्यात आलेलं आहे, आणि हेच कारण आहे की त्यांची वक्तव्य सुद्धा आता बदलत चालली आहेत,’ असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता, पण हा राजीनामा होऊ शकला नाही. कारण कुठेतरी फडणवीस त्यांना वाचवतायेत असं आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे, असा आरोप देखील यावेळी दमानिया यांनी केला आहे.  येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आणखी मोठे खुलासे या संदर्भात करणार आहे आणि त्यानंतर नेमकं चित्र काय आहे ते देखील स्पष्ट होईल. या विरोधात आम्ही आता ठोस कारवाई करण्याच्या तयारीला लागलो आहोत. दोन ते तीन दिवसांमध्ये एक मोठा घोटाळा बाहेर पडणार आहे, असा इशाराही यावेळी दमानिया यांनी दिला आहे.

पकंजा मुंडेंना टोला  

पंकजाताई मुंडे या जर म्हणत असतील की मुंडेंचे समर्थक एकवटले की एक पक्ष तयार होईल तर मग माझा त्यांना प्रश्न आहे की त्या भाजप सोडणार आहेत का? विधान परिषद सोडणार का? आणि मंत्रीपदही सोडणार का? तेव्हा जाऊनच त्यांना ओबीसींचा नवीन पक्ष काढता येईल, असा टोलाही यावेळी दमानिया यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार? मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार?
धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा...
‘अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’मुळे शाळेतील विद्यार्थी बिघडतायत’; शिक्षिकेची तक्रार
पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी, प्रथमेश परब बायकोसह थायलंडला; थेट वाघाच्याच पुढ्यात बसून…
‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मधुराणी प्रभुलकर दिसणार सिनेमात, स्वत: केला खुलासा
भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले ‘देशप्रेम काय असतं हे..’
‘या’ कारणामुळे ‘हेरा फेरी ३’मधून कार्तिक आर्यन बाहेर; परेश रावल यांचा मोठा खुलासा
‘छावा’च्या समोरही अर्जुन कपूरच्या चित्रपटाचं नशीब जोरावर; करोडोंचा गल्ला