डिप्रेशन, 3 सर्जरी अन् आता वल्गर पश्नाबद्दल ट्रोल होणारा युट्यूबर रणवीर अलाहबादिया नक्की आहे तरी कोण?
सध्या युट्यूबवर अनेक पॉडकास्ट शो सुरु आहेत. या पॉडकास्ट शोमध्ये अनेक विविध विषयांवर चर्चा होताना दिसते. असाच एक पॉडकास्ट शो आहे जो प्रचंड पसंतीचा आणि चर्चेत राहाणारा आहे. या शोचा युट्यूबर अन् पॉडकास्टरही सर्वांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. हा पॉडकास्टर त्याच्या शोमध्ये भूत, प्रेत, अध्यात्म, ते अभिनय क्षेत्र, अॅस्ट्रोलॉजी ते अनेक फॅक्टवरील विषय तो घेऊन येत असतो. तसेच एक्सपर्टही त्याच्या शोला हजेरी लावताना दिसतात.
रणवीर अलाहबादिया का होतोय ट्रोल?
हा युट्यूबर आणि पॉडकास्टर आहे रणवीर अलाहबादिया, ज्याला बीअरबायसेप्स म्हणूनही ओळखले जाते. मात्र अलिकडेच एका विधानामुळे तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. तो युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये दिसला. या शोमध्ये त्याच्यासोबत आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा हे देखील होते. या शोमध्ये स्पर्धकांना विनोदी पद्धतीने प्रश्न विचारले जातात, पण यावेळी रणवीरच्या एका कमेंटने गोंधळ उडाला.
रणवीर अलाहबादियाची सध्या एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यामध्ये युट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा हे स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. रणवीरने आई-वडीलांच्या नात्यावर एक वल्गर प्रश्न विचारल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या तिघांवरही टीका केली आहे.
एवढंच नाही तर काही युजर्सनी ‘सांस्कृतिक मंत्रालयाला’ या तिघांवर कारवाई करण्याची मागणीही केली. दरम्यान याबाबत रणवीरची कोणतीही प्रतिक्रिया दिली असून त्याने या प्रकरणाबाबत माफिही मागितली आहे.तसचे “आई-वडिलांबाबत अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी त्यासाठी माफी मागतो” असं म्हणत त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.
I shouldn’t have said what I said on India’s got latent. I’m sorry. pic.twitter.com/BaLEx5J0kd
— Ranveer Allahbadia (@BeerBicepsGuy) February 10, 2025
युट्यूबच्या जगातील एक मोठं नाव
आता जरी त्याच्यावर ट्रोलिंग होत असली रणवीर इलाहाबादिया हे युट्यूबच्या जगात एक मोठं नाव बनलं आहे. त्याच्या कठोर परिश्रमामुळे त्याला इतकी लोकप्रियता मिळवली आहे. एक वेळ अशी आली जेव्हा तो नैराश्याचा बळी पडला. एक वेळ अशी आली की दोन वर्षांत त्याच्यावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाली होती. हे सर्व असूनही, त्याने युट्यूबच्या जगात स्वतःचं नाव कमावलं.
Nahh man
Beerbicep’s would you rather are wildpic.twitter.com/GKJGw4BYke
— CaLM dAdA (@faded_clone17) February 8, 2025
16 वर्षांचा असताना रणवीरच्या तीन सर्जरी
रणवीर इलाहाबादियाचा जन्म 2 जून 1993 रोजी मुंबईत झाला. त्याचे पालक डॉक्टर आहेत. तथापि, त्याच्या पालकांच्या कारकिर्दीपेक्षा वेगळं, त्यानं अभियांत्रिकी निवडली. तथापि, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने यूट्यूबच्या जगात प्रवेश केला. त्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. रणवीर लहानपणी एक गुबगुबीत मुलगा होता.
2009 मध्ये, जेव्हा तो फक्त 16 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर, 2011 पर्यंत त्याच्यावर आणखी दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर त्याने निरोगी जीवनशैली जगण्याचा निर्णय घेतला.
जेव्हा रणवीर नैराश्यात गेला
कॉलेजच्या काळात रणवीरला डिप्रेशनचाही सामना करावा लागला होता. खरंतर, तो वर्षानुवर्षे कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे नाते तुटले.
काही काळानंतर, त्याचे मन पुन्हा एका मुलीमध्ये गुंतले होते यावेळीही त्यांचे नाते टिकले नाही. यानंतर मात्र तो डिप्रेशनमध्ये गेला. तो दारू पिऊ लागला. एवढेच नाही तर तो अभ्यासापासूनही दूर जाऊ लागला. पण, नंतर त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले.
9 ते 5 अशी नोकरी करायची नव्हती
रणवीरने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते, पण त्याने ठरवले होते की तो 9 ते 5 अशी नोकरी करणार नाही. त्यानंतर 2015 मध्ये त्याने बीअरबायसेप्स नावाचे त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्यांनतर त्याने स्वत:मध्ये अनेक सकारात्मक बदल केले. मेडिटेशन, योगा यांसारख्या नैसर्गिक गोष्टींच्या आणि सवयींच्या आधारे त्याने त्याचं आयुष्यच पूर्ण बदलं. त्याने कामावरही तेवढचं फोकस केलं आणि सध्याची त्याच्या पॉडकास्टची प्रसिद्धी पाहाता त्याची मेहनत नक्कीच दिसत आहे.
पंतप्रधान मोदींंकडूनही कौतुक
एवढच नाही तर जेव्हा सर्व इन्फ्ल्युअर्सचा गौरव करण्यात आला होता. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशातील सर्वाधिक प्रभावी सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा समावेश केला होता. त्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती रणवीर अलाहबादियाची. तेव्हा पंतप्रधान मोदींनीही त्याची पाठ थोपटली आणि त्याचं कौतुक केलं होतं. दरम्यान रणवीरची इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही 3 मिलियन पेक्षा जास्त आहे. तर युट्युबर फॉलो करणाऱ्यांची संख्या 7 मिलियनपेक्षाही जास्त आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List