Pune News – सायबर सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार, महिलांना साक्षर करणार; परिपत्रक केले जारी
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकीकडे सर्व गोष्टी आधुनिक आणि झटपट झाल्या आहेत. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. विशेषकरुन महिलांना याचा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे सर्वांनीच पुढाकार घेऊन या विषयी जनजागृती करण्याची गरज आहे. याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी यांनी एक परिपत्रक जारी करत महिलांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे.
डिजिटल युगामध्ये इंटरनेटचा वापर अधिक आहे. तसेच स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारांचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागातील महिला ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडियाचा वापर करत असल्याने ओटीपी शेअर करणे, कोणत्याही लिंक वरती क्लिक करून वैयक्तिक माहिती देणे यामुळे बँकिंग फ्रॉड होण्याची शक्यता वाढलेली आहे. तसेच महिलांना सायबर छळ, ट्रोलिंग होण्याचा धोका वाढलेला आहे. याशिवाय डेटा सुरक्षेचा अभाव आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव यामुळे महिलांची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. याच अनुषंगाने “सायबर सुरक्षा जागरुकता” या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायीच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी दि .1 फेब्रुवारी 2025 ते दि. 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यायचा आहे. गावा गावामध्ये दवंडी देऊन या प्रशिक्षणाची वेळ आणि ठिकाण गावकऱ्यांना सांगायची आहे. तसेच MKCLकंम्प्युटर चालकांसोबत समन्वय साधून यशस्वी अंमलबजावणी करायची आहे. गावातील महिला जेथे पोहोचू शकत नाहीत अशांशाठी ग्रामपंचायीमध्येच कंम्प्युटर प्रतिनिधी बोलावून त्याने प्रशिक्षण द्यायचे आहे. येणाऱ्या दिनांक 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनापर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने आपापल्या गावांमध्ये सर्व महिलांचे सायबर सुरक्षा जागृती प्रशिक्षण पूर्ण होईल असे नियोजन करावे, असे पत्र जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती, तालुका अभियान व्यवस्थापक सर्व पंचायत समिती यांना पत्राद्वारे कळविले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List